क्रौर्याचा कळस! पतीने पत्नीच्या गळ्यात खुपसली कात्री, डोके हातोड्याने फोडले; मृत्यूनंतर गुप्तांगावरही वार
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
कार खरेदी करण्यासाठी तिच्याकडे 30,000 रुपये मागितले होते. सततची भांडणं आणि पत्नी पैसे देत नाही या कारणांमुळे तो वैतागलेला होता.
हैदराबाद : गुन्हेगारी विश्वातल्या बातम्या अनेकदा आपल्याला आश्चर्य वाटायला लावणाऱ्या असतात. माणसं माणसांशीच एवढी क्रौर्याने कशी वागू शकतात असा प्रश्न या बातम्या पाहिल्या की पडतो. अशा घटना सतत समोर येत असतातच पण हैदराबादमधली ही घटना थोडी वेगळी आणि जास्त भयानक आहे. बायकोने पैसे द्यायला नकार दिला म्हणून नवऱ्याने तिला संपवण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो समजल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
सध्या या प्रकरणातील आरोपी असलेला नवरा तुरुंगाची हवा खात आहे. ज्या बायकोबरोबर आयुष्यातली सगळी सुखदुःख वाटून घ्यायची तिच्याशी वागताना त्याने अमानुषपणाची परिसीमा गाठली आहे. हे प्रकरण ऐकून न्यायालयानेही आरोपीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढलेत आणि त्याला तुरुंगात टाकलंय. शिवाय 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय. सदर आरोपी 38 वर्षांचा आहे.
हे प्रकरण 2019 मधलं आहे. इम्रान उल-हक असं या गुन्हेगाराचं नाव आहे. इम्रान आपल्या पत्नीला अत्यंत वाईट पद्धतीने वागवत असे. त्याने कार खरेदी करण्यासाठी तिच्याकडे 30,000 रुपये मागितले होते. सततची भांडणं आणि पत्नी पैसे देत नाही या कारणांमुळे तो वैतागलेला होता. त्यामुळे तो थेट आपल्या पत्नीला संपवण्याचा कट रचू लागला. तिला संपवण्याचा कट रचत असला तरी दुसरीकडे तो तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्नही करत होताच. पत्नी मात्र त्याला पैसे देण्याच्या बाबतीत आपल्या नकारावर ठाम होती. तिचा हा नकार त्याला पचवता येत नव्हता. त्यामुळे सहा जानेवारी 2019 ला त्याने पैसे मागायचा शेवटचा प्रयत्न केला. पत्नीने परत एकदा नकार दिल्यानंतर इम्रानच्या संतापाचा कडेलोट झाला.
advertisement
इम्रानने सहा जानेवारीला रात्री पत्नीच्या गळ्यात कात्री खुपसली. त्यानंतर हातोड्याने त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यावर वार केले. पत्नीचा मृत्यू झालाय अशी शंका आली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते करण्याआधी त्याने तिच्या गुप्तांगालाही इजा केली.
महिलेच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302 खाली इम्रानवर गुन्हा दाखल केला. त्याला अटक करताना काही अडचण आली नाही मात्र चौकशीमध्ये त्याने कुठलंही सहकार्य केलं नाही शिवाय आपण असं कृत्य केलंच नसल्याचं तो म्हणत राहिला. असं असलं तरी घटनास्थळावरचे पुरावे त्याने केलेला गुन्हा सरळसरळ उघड करणारेच होते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन चौकशी केली असता इम्रानने गुन्ह्याची कबुली दिली. तब्बल पाच वर्षं चाललेल्या कोर्टकचेरी नंतर आता इम्रान तुरुंगात शिक्षा भोगत आहे. असं असलं तरी पाच वर्षांनंतरही हैदराबाद या कृष्णकृत्याच्या आठवणी विसरलेलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2024 2:56 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
क्रौर्याचा कळस! पतीने पत्नीच्या गळ्यात खुपसली कात्री, डोके हातोड्याने फोडले; मृत्यूनंतर गुप्तांगावरही वार