Crime News : पोटच्या दीड महिन्यांच्या जीवाला उकळत्या पाण्यात टाकलं, जन्मदाती का झाली हैवान, धक्कादायक कारण समोर

Last Updated:

Crime News : ज्या जीवाला पोटात नऊ महिने ठेवलं, त्याच्या भविष्यासोबत आईपणाची जबाबदारी पार पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आईच्या कृत्याने एकच खळबळ उडाली.

File Photo
File Photo
Crime News: ज्या जीवाला पोटात नऊ महिने ठेवलं, त्याच्या भविष्यासोबत आईपणाची जबाबदारी पार पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आईच्या कृत्याने एकच खळबळ उडाली. एका आईने आपल्याच पोटच्या गोळ्याला निर्दयीपणे संपवले. बेंगळुरूमधील एका घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसर हादरलं आहे.
ही दुःखद घटना बेंगळुरूजवळील नेलमंगला तालुक्यातील विशिषापुरा (नागल्लू) गावातील आहे. येथे राहणाऱ्या राधे नावाच्या महिलेने तिच्या दीड महिन्याच्या मुलाला उकळत्या पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून मारले. चिमुकल्या बाळाने काही दिवसांपूर्वीच या जगात प्रवेश केला होता.
राधे आणि तिचा पती पवन यांनी नुकतेच एका मुलाला जन्म दिला होता. पण पवनला दारूचे व्यसन होते. घरात पैशांची कमतरता होती आणि तो राधेची किंवा मुलाची काळजी घेऊ शकत नव्हता. या सर्व परिस्थितीमुळे राधे मानसिकदृष्ट्या खचली होती. या खिन्नतेतून तिने चिमुकल्या बाळाला ठार केलं असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement

रात्री उशिरा घडली घटना...

रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सर्वजण झोपलेले असताना राधेने शांतपणे तिच्या मुलाला मांडीवर घेतले आणि उकळत्या पाण्यात टाकले. काही क्षणातच त्या निष्पाप मुलाचा जीव गेला. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नेलमंगला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. गरिबी आणि घरगुती परिस्थिती खरोखरच आईला इतके निर्दयी बनवू शकते का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : पोटच्या दीड महिन्यांच्या जीवाला उकळत्या पाण्यात टाकलं, जन्मदाती का झाली हैवान, धक्कादायक कारण समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement