advertisement

24 वर्षांपासून तिथेच करत होती काम; मोलकरणीने 6 महिन्यांआधीच रचला कट, डॉक्टरच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Last Updated:

घरात काम करणारी 60 वर्षीय मोलकरीण बसंती ही हत्या आणि दरोड्याची कथित सूत्रधार आहे. बसंती 24 वर्षांपासून मृत डॉक्टरांकडे काम करत होती.

6 महिन्यांआधीच रचला कट
6 महिन्यांआधीच रचला कट
नवी दिल्ली : दिल्लीतल्या जंगपुरा भागात राहणाऱ्या एका वृद्ध डॉक्टरची काही दिवसांपूर्वी राहत्या घरात निर्दयपणे हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी त्यांचा खूप छळ करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. हत्येचा तपास करत असताना पोलिसांना आढळून आलं आहे, की घरात काम करणारी 60 वर्षीय मोलकरीण बसंती ही हत्या आणि दरोड्याची कथित सूत्रधार आहे. बसंती 24 वर्षांपासून मृत डॉक्टरांकडे काम करत होती.
पोलिसांनी सांगितलं की, ती तिच्या साथीदारांना गुन्हा करण्यासाठी मदत करण्याकरता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डॉक्टरच्या घराचे फोटो शेअर करत होती. दिल्ली पोलिसांनी सोमवारी चार फरार संशयितांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी संशयितांचे स्केचही बनवले आहेत आणि ती विविध राज्यांच्या पोलीस विभागांना तसेच नेपाळ पोलिसांशी शेअर केली आहेत.
advertisement
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, 'चोरीसाठीचं प्लॅनिंग दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालं होतं. बसंती तिच्या फेसबुक अकाउंटवर सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून फोटो पोस्ट करत होती. ती खोल्या आणि घराचे फोटो काढायची आणि पोस्ट करायची. आम्हाला वाटतं, की तिने बऱ्याच काळापासून मौल्यवान वस्तू लुटण्याची योजना आखली होती आणि सर्व खोल्यांच्या फोटोंची नोंद ठेवली होती. नंतर तिने या प्लॅनमध्ये तिच्या मैत्रिणी वर्षा आणि सईचाही समावेश केला.'
advertisement
पोलिसांनी रविवारी सांगितलं की त्यांनी बसंती, हरिद्वार येथील पुजारी हिमांशू (38) आणि त्याचा भाऊ आकाश यांना अटक केली आहे. आरोपींनी तीन नेपाळी नागरिक आणि आणखी एका नोकराची मदत घेतल्याचा आरोप आहे, ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉ. योगेश चंद्र पॉल यांची शुक्रवारी त्यांच्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी डॉ. नीना पॉल यांना स्वयंपाकघरात पतीचा मृतदेह आढळला. आरोपींनी दुपारी दीड वाजता क्लिनिकमधून घरी परतलेल्या डॉ. योगेश यांच्या घरात घुसून त्यांचे हात बांधून, गळा आवळून खून केला. हत्येपूर्वी आरोपींनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. घटनेनंतर आरोपींनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
24 वर्षांपासून तिथेच करत होती काम; मोलकरणीने 6 महिन्यांआधीच रचला कट, डॉक्टरच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement