Dharashiv Crime News: अनैतिक संबंध ठेवायची आणि...वैतागलेल्या तरुणाने सुपारी देऊन महिलेचा काढला काटा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Dharashiv Crime News: 17 नोव्हेंबर रोजी महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळळा होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सूरूवात केली होती. यावेळी महिलेच्या शरीरावरील जखमा पाहूनच पोलिसांना हत्येचा संशय आला होता.
बालाजी निरफळ, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सोनारी नदीपात्रात सापडला होता. प्रथम दर्शनी ही घटना पाहिली असता आत्महत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत होते. मात्र आता या प्रकरणात महिलेचा खुन झाल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येमागचं धक्कादायक कारण देखील समोर आले आहे. या घटनेने धाराशिव जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे आरोपी तरूणासोबत अनैतिक संबंध होते. यामध्ये महिला तरूणासोबत अनैतिक संबंध ठेवायची आणि सतत पैशाची मागणी करायची. महिलेच्या याच मागणीला वैतागून तरूणाने तिच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी तरूणाने तीन जणांना 92 हजारांची सुपारी दिली होती.
advertisement
आरोपी तरूणाने दिलेल्या सुपारीनंतर तीनही आरोपींनी महिलेच्या शरीरावर आणि डोक्यावर वार करत तिचा गळा आवळून तिची हत्या केली.या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह सोनारी ते परंडा रोडवरील हरण ओढ्यात फेकून दिला होता.
या घटनेनंतर 17 नोव्हेंबर रोजी महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळळा होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सूरूवात केली होती. यावेळी महिलेच्या शरीरावरील जखमा पाहूनच पोलिसांना हत्येचा संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या हत्येच्या दिशेने तपास सूरू केला होता. या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती संदीप उत्तम तोरणे हा तरूण लागला होता.या तरूणाची कसून चौकशी केली असता त्याने हत्येचा उलगडा केला, अशी माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे
advertisement
या प्रकरणात मुख्य आरोपीने तीन जणांना 92 हजाराची सुपारी देऊन महिलेची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तसेच या आरोपींनी न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 26, 2024 9:47 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Dharashiv Crime News: अनैतिक संबंध ठेवायची आणि...वैतागलेल्या तरुणाने सुपारी देऊन महिलेचा काढला काटा