लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्याने तिच्याशी ठेवले नाही संबंध, पतीचं सत्य ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
- Published by:sachin Salve
Last Updated:
तिने बाहेर याची वाच्यता करू नये किंवा काही अडचण निर्माण करू नये म्हणून सासरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली
ग्वाल्हेर : सध्याच्या काळात लग्नाच्या बाबतीत मुलीची किंवा मुलाची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने आपल्या कुटुंबीयांनी निवडलेल्या मुलाशी लग्न केलं होतं; मात्र लग्नाला चार वर्षं उलटूनही पतीने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. आपल्यावर उपचार सुरू असल्याचं कारण देऊन तो पत्नीला टाळत होता. सहनशीलता संपल्याने पीडितेने विरोध करण्यास सुरुवात केली. तिने बाहेर याची वाच्यता करू नये किंवा काही अडचण निर्माण करू नये म्हणून सासरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिच्या नणंदेलादेखील रात्री तिच्याच खोलीत झोपण्यासाठी पाठवलं गेलं.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 2020मध्ये ग्वाल्हेर शहरातल्या एका तरुणीचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. तिच्या कुटुंबीयांनी लग्नात लाखो रुपयांच्या भेटवस्तू आणि हुंडादेखील दिला होता. लग्नाला चार वर्षं उलटूनही पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. पीडित पत्नी जेव्हा याबाबत पतीला विचारणा करत असे, तेव्हा तो डॉक्टरांचे उपचार सुरू असल्याचं कारण देऊन तिला टाळत असे. तिने जास्त आग्रह धरण्यास सुरुवात केल्यानंतर सासरच्यांनी नणंदेला तिच्या खोलीत झोपायला पाठवायला सुरुवात केली.
advertisement
एक दिवस पीडित तरुणी खरेदीसाठी बाजारात गेली असता तिच्या पतीचं बिगं फुटलं. तिचा पती महिलांचे कपडे घालून तृतीयपंथांच्या टोळीसोबत फिरत होता. पतीचं सत्य समोर येताच तिने बाजारात गोंधळ घातला. एका इव्हेंट कंपनीत काम करत असल्यामुळे आपण अशा ड्रेसमध्ये फिरत असल्याचं कारण पतीने दिलं; मात्र तिने त्यावर विश्वास ठेवला नाही. तिने घरी जाऊन सासरच्या मंडळींना याबाबत जाब विचारला; मात्र, त्यांनी तिला दमदाटी करून कोंडून ठेवलं. एवढंच नाही, तर तिला उपाशी ठेवून अनेक वेळा मारहाणही करण्यात आली. त्यांनी तिच्याकडे दोन लाख रुपये हुंडा आणि स्कूटरची मागणीदेखील सुरू केली. पीडित तरुणीने घरातून पळ काढून पोलीस स्टेशन गाठलं.
advertisement
हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून पुढचा तपास सुरू केला आहे. सासरच्यांची चौकशी केली जाईल. आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
Location :
Madhya Pradesh
First Published :
November 25, 2024 11:10 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्याने तिच्याशी ठेवले नाही संबंध, पतीचं सत्य ऐकून तुम्हालाही बसेल धक्का