ED Arrest Congress MLA : कॅसिनो भाडेतत्वार देण्यासाठी गेला अन् ईडीच्या बेड्या पडल्या, काँग्रेस आमदाराला अटक, मोठं घबाडही सापडलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
ED arrests Congress MLA : कॅसिनो भाडेतत्वावर देण्यासाठी सिक्कीमच्या गंगटोकमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या कर्नाटकच्या आमदाराला ईडीने अटक केली.
नवी दिल्ली: कॅसिनो भाडेतत्वावर देण्यासाठी सिक्कीमच्या गंगटोकमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या कर्नाटकच्या आमदाराला ईडीने अटक केली. काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र पप्पी यांच्यावर ईडीने ही कारवाई केली. ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीने अटकेसोबत काही ठिकाणी छापेमारीदेखील केली. या कारवाईत ईडीच्या हाती घबाड लागलं.
कर्नाटकमधील चित्रदुर्ग मतदारसंघाचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना शुक्रवारी अटक केल्यानंतर गंगटोक येथील दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आलं. त्यानंतर बंगळुरूतील न्यायालयासमोर हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांडमध्ये घेण्यात आले.
मुंबई, गोवा, जोधपूरसह 31 ठिकाणी छापे...
ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास बेंगळुरूमधील ईडीकडून सुरू आहे. ईडी अधिकाऱ्याने सांगितले की, 22 व 23 ऑगस्ट रोजी गंगटोक, चित्रदूर्ग, बंगळुरू शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई व गोव्यासह देशभरातील 31 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये 5 कॅसिनोंचा देखील समावेश असल्याची माहिती देण्यात आली. वीरेंद्र यांच्या मागावर असलेल्या ईडीने त्यांना सिक्कीममध्ये अटक केली. ईडीने आपल्या कारवाईचा फास आवळत आमदारांची 17 बँक खाती आणि 2 बँक लॉकर गोठवली आहेत. वीरेंद्र यांच्यासह त्यांचे बंधू के.सी. नागराज आणि त्यांचे पुत्र पृथ्वी एन. राज यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईतही काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
छापेमारीच्या कारवाईत काय सापडलं?
ईडीच्या तपास पथकाने केलेल्या छापेमारीच्या कारवाईत 12 कोटी रुपये रोख, एक कोटी किमतीचे परदेशी चलन, 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदी आणि 4 वाहने जप्त केली आहेत. मात्र, ही संपत्ती कुठून जप्त झाली, याची तपशील देण्यात आला नाही.
ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, किंग 567 या नावाने अनेक ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइट्स हे आमदार वीरेंद्र चालवत आहेत. त्याशिवाय, डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नोलॉजीज, प्राइम-9 टेक्नोलॉजीस या कंपन्या आणि कॉल सेंटर, गेमिंग व्यवसाय आमदार वीरेंद्र यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले असल्याचे ईडीने सांगितले.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
August 24, 2025 11:17 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ED Arrest Congress MLA : कॅसिनो भाडेतत्वार देण्यासाठी गेला अन् ईडीच्या बेड्या पडल्या, काँग्रेस आमदाराला अटक, मोठं घबाडही सापडलं


