असा मित्र नको देऊ देवा!, आधी स्टेटसवर गायले मैत्रीचे गोडवे नंतर व्यापारी मित्राची लाखोंची फसवणूक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - पवन सोनी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता ओम सिंह, मंगेश कुमावत, प्रेम सिंह, शैतान सिंह आणि बाबू सिंह या साथीदारांसह फलोदी येथे खरेदीसाठी गेले होते.
कुलदीप छंगनी, प्रतिनिधी
जैसलमेर : प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेकांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. मात्र, एका मित्राने आपल्या मित्राची चांगली फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जैसलमेरचे रामदेवरा येथील दोन मित्रांच्या मैत्रीचे उदाहरण संपूर्ण शहरात दिले जायचे. यामध्ये दोन्ही मित्र हे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करायचे. तसेच “दोस्ती बडी नहीं होती, निभाने वाला बडा होता है,” असे कॅप्शनही ते लिहायचे. मात्र, पुढे जे घडले त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
एका मित्राने दुसऱ्या मित्राचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मंगेश कुमावत असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी आपला मित्र पवन सोनी या व्यापारी मित्राच्या वाहनातील लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. हे दागिने घेऊन तो फरार झाला आहे.
मंगेश कुमावत आणि पवन सोनी हे दोन्ही मित्र होते. तसेच पवन यांचा रामदेवरामध्ये सोने-चांदीचे दुकान आहे. 20 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास पवन सोनी हे नेहमीनुसार मंगेशला आपल्या स्कॉर्पियों वाहनात बसवून घरी घेऊन जात होते. वाहनात 500 ग्रॅम सोने आणि 12 किलो चांदीची बॅग होती. पवन आपल्या घरी गेट खोलण्यासाठी गेला असता मंगेश लाखो रुपयांचे दागिन्यांसह वाहन घेऊन फरार झाला.
advertisement
पवन सोनी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता ओम सिंह, मंगेश कुमावत, प्रेम सिंह, शैतान सिंह आणि बाबू सिंह या साथीदारांसह फलोदी येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर सर्वजण रामदेवरा येथे परतले आणि ओम सिंह यांच्या घरी त्यांनी पार्टी केली. यानंतर पवन आणि मंगेश मार्केटमध्ये असलेल्या त्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले. तिथे पवनने दुकानातून एक बॅग घेऊन गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवली.
advertisement
यानंतर घरी परतत असताना मंगेशने मला गाडी चालवायला मागितली. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने मी त्याला गाडी चालवायला दिली. दरम्यान, मी आपल्या घराचा दरवाजा उघडायला गेलो असता मंगेश गाडी घेऊन फरार झाला.
ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. पवनने मंगेशला कॉल केला असता त्याने विविध कारणे दिली. यानंतर पवनने वाहनाचे जीपीएस लोकेशन ट्रॅक केले. त्यावरून हे वाहन लोहारकी गावाकडे जात असल्याचे समजले. यानंतर पवनने वाहनाचे इंजिन जीपीएस वापरून बंद केले आणि पोलिसांना माहिती दिली.
advertisement
यानंतर रामदेवरा पोलिसांनी लोकेशनवर पोहोचल्यावर हे वाहन 20 किलोमीटर दूर उभे असल्याचे दिसले. मात्र त्यातून मंगेश आणि बॅग दोन्ही गायब होते. ही घटना होऊन 9 दिवस झाले असून आरोपी मंगेश कुमावतचा कोणताही शोध लागलेला नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Location :
Jaisalmer,Rajasthan
First Published :
November 29, 2024 7:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
असा मित्र नको देऊ देवा!, आधी स्टेटसवर गायले मैत्रीचे गोडवे नंतर व्यापारी मित्राची लाखोंची फसवणूक