Crime News : वृद्धाने ओलांडल्या सर्व मर्यादा, अल्पवयीन नातीसोबत धक्कादायक कांड, 111 वर्षांची शिक्षा

Last Updated:

Crime News : केरळ न्यायालयाने 2021 मध्ये आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी 62 वर्षीय व्यक्तीला एकूण 111 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

News18
News18
कोची : केरळमध्ये 2021 मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. येथील एका वृद्ध व्यक्तीनं त्याच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी आरोपी आजोबा दोषी सिद्ध झाल्यावर विशेष ट्रायल कोर्टाने पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. आरोपीला विविध कलमांअन्वये शिक्षा झाल्या असून, त्या त्याला एकाचवेळी भोगायच्या आहेत, असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.
केरळमधल्या एका न्यायालयाने 62 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी 111 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2021 मध्ये घडलेल्या या घटनेची सुनावणी करताना न्यायालयाने आजोबांना स्वतःच्या नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत एकूण 111 वर्षांची शिक्षा सुनावली. या व्यक्तीला 111 वर्षांची शिक्षा झाली असली तरी 30 वर्ष तो तुरुंगात राहणार आहे. या सोबतच न्यायालयाने त्याला दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
advertisement
या बाबत सरकारी वकील (पीपी) मनोज अरूर यांनी सांगितलं की, नादापुरम विशेष ट्रायल कोर्टाचे (पॉक्सो) न्यायाधीश सुहैब एम. यांनी आरोपीला बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पॉक्सो) विविध कलमांतर्गत वेगवेगळ्या मुदतीची शिक्षा सुनावली असून तिचा कालावधी 111 वर्ष आहे. दोषीला दोन लाख 10 हजार रुपयांचे दंडही ठोठावण्यात आला आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावी लागणार आहे. यात सर्वात मोठी शिक्षा 30 वर्षांची असल्याने दोषी 30 वर्षे तुरुंगात राहील. उर्वरित शिक्षा त्याचवेळी भोगाव्या लागतील आणि मग त्या संपतील.
advertisement
वाचा - ..म्हणे मी ईडीमध्ये अधिकारी, सोशल मीडियावरील प्रियकराकडून तरुणीची मोठी फसवणूक
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2021 मध्ये पीडित मुलगी ख्रिसमसच्या सुट्टीत आजोबांना भेटायला गेली होती. त्यावेळी आरोपीनं हा गुन्हा केला. नात एकटी असल्याचे पाहून आजोबांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकावत ही गोष्ट कोणालाही सांगू नको असं बजावलं. यामुळे पीडित मुलगी खूप घाबरली होती. पण तिनं शाळेतल्या एका मैत्रिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेबाबतची माहिती समोर आली. अशा घटना कुटंबात घडतात पण मुली त्याची वाच्यता करत नाहीत, पालकांनी सहानुभूतीने विचारल्यास कदाचित त्या अशा घटनांबाबत सांगतात.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : वृद्धाने ओलांडल्या सर्व मर्यादा, अल्पवयीन नातीसोबत धक्कादायक कांड, 111 वर्षांची शिक्षा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement