advertisement

नातूच बनला कर्दनकाळ! दागिन्यांसाठी आजीचे तोडले कान अन् गाठली MP ची बॉर्डर, जालना हादरले

Last Updated:

एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य अवघ्या बावीस वर्षांच्या तरूणानं केलं आहे.

News18
News18
रवी जैस्वाल, प्रतिनिधी
जालना : आजी, आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. नातवाचे पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. मात्र आजी आणि नातवाच्या या नात्याला काळिमा फासणारी घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. आजीच्या दागिन्यांसाठी नातवांनी चक्क तिचे कान तोडून हत्या केल्याची घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील घटना घडली आहे. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य अवघ्या बावीस वर्षांच्या तरूणानं केलं आहे.
advertisement
दागिन्यांसाठी एका 65 वर्षाच्या वृद्ध महिलेची तिच्याच नातवांनी कान तोडून आणि गळा आवळून हत्या केली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलिसांनी वृद्धेच्या दोन्हीही नातवांना अटक केलीय. 22 वर्षीय प्रदीप उर्फ काकासाहेब ढाकणे आणि 26 वर्षीय संदीप ढाकणे अशी आरोपी नातवांची नावं आहेत. 29 एप्रिल रोजी आरोपींनी ही हत्या केली होती.
advertisement

कसे केले आरोपी जेरबंद? 

या प्रकरणात आरोपींना शोधण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. या घटनेचा तपास सुरू असताना यातील आरोपी प्रदीप उर्फ काकासाहेब ढाकणे हा घटनास्थळी होता पण नंतर तो फरार झाला. तर दुसरा आरोपी संदीप हा देखील फरार झाला. या घटनांमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांच्या पथकाने आरोपींना मध्य प्रदेश राज्याच्या बॉर्डरवरून अटक केली. दरम्यान आरोपींनी दागिने चोरल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. .या प्रकरणी पोलिस अधिक तपास करतायत
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नातूच बनला कर्दनकाळ! दागिन्यांसाठी आजीचे तोडले कान अन् गाठली MP ची बॉर्डर, जालना हादरले
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement