पुण्यातून आणखी एक भयावह CCTV व्हिडीओ समोर, तहुरा विक्रेत्याला टोळक्याची बेदम मारहाण

Last Updated:

VIRAL VIDEO: पुण्यात एका टोळीने तहुरा विक्रेत्याला मारहाण बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील कोथरुड परिसरात एका टोळक्याने तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. रस्त्यावर गाडी आडवी लावल्याच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना ताजी असताना आता पुण्यातून आणखी एक भयानक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्यात एका टोळीने तहुरा विक्रेत्याला मारहाण बेदम मारहाण केली आहे. पुण्यातील मोमीनपुरा भागात ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीनंतर टोळक्याने तहुरा विक्रेत्याच्या गाडीचे देखील नुकसान केलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सुरुवातीला या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा दावा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.
advertisement
पीडित व्यक्ती पुण्यातील मोमिनपुरा इथं प्रसिद्ध तहुरा कोल्ड्रिंक विकतो. गुरुवारी रात्री एका टोळक्यानं त्यांना मारहाण केली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी पीडित तहुरा विक्रेत्याच्या गाडीचं देखील नुकसान केलं. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही मारहाण नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप समजू शकलं नाही. ही घटना दोन दिवसापूर्वीची असून आता घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
या सगळ्या प्रकरणावर आता काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीने मारहाण केली, त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसायला खुर्ची दिली. ज्याने मार खाल्ला, त्याला बाहेर काढलं. त्यानंतर आरोपीने 'एक कॉल आणि विषय सॉल्व्ह' अशा प्रकारची सोशल मीडिया पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा फोटो होता, असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. शिवाय त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पुण्याचे पोलीस नक्की काय करतात? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
मराठी बातम्या/क्राइम/
पुण्यातून आणखी एक भयावह CCTV व्हिडीओ समोर, तहुरा विक्रेत्याला टोळक्याची बेदम मारहाण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement