Nashik Crime: बाइकवरून येत पाडला रक्ताचा सडा, मालेगावात मध्यरात्री व्यापाऱ्यावर गोळीबार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Malegaon: नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एका व्यापाऱ्यावर फायरींग केली आहे.
बब्बू शेंख, प्रतिनिधी मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एका व्यापाऱ्यावर फायरींग केली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यापारी जखमी झाले आहेत. हल्ल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मालेगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गांवरील चाळीसगाव फाट्याजवळ घडली. यावेळी व्यापारी खालिद खान हे आपल्या घरी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी त्यांच्यावर दोन राऊंड फायर केले. यात ते किरकोळ जखमी झाले. मध्यरात्री अशाप्रकारे गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. बराच वेळ याठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
advertisement
गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपीना जेरबंद केले. शाहीन चोरवा आणि उमर अहमद अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. व्यापारी खालीद यांच्यावर आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 27, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nashik Crime: बाइकवरून येत पाडला रक्ताचा सडा, मालेगावात मध्यरात्री व्यापाऱ्यावर गोळीबार