धक्कादायक, निकाहाच्या 16 वर्षांनी दुसरीच्या नादात पत्नीला तलाक, विष घेतल्याचं नाटकही केलं
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - पीडित महिलेच्या भावाने पोलिसांना तक्रार देत सांगितले की, 16 वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचे लग्न समी आलम सोबत झाले होते. दोघांना दोन मुलीही आहेत. दरम्यान, समी लग्नाच्या दोन वर्षांनंतर एका मुलीला घेऊन पळून गेला होता.
दिक्षा बिश्त, प्रतिनिधी
हल्द्वानी - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दिसत आहे. तसेच पती पत्नीच्या घटस्फोटाच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अशातच आता आणखी एक घटना उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथून समोर आली आहे. याठिकाणी निकाह केल्यानंतर 16 वर्षांनी पतीने आपल्या पत्नीला तलाक दिला आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याने त्याने आपल्या पत्नीला तलाक दिला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
पीडित महिलेने काय म्हटले -
पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असून त्याच महिलेच्या चक्करमध्ये पतीने कुटुंबासमोर तिला तलाक दिला आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने बहिणीच्या पतीविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समी आलम असे आरोपी पतीचे नाव आहे. बनभूलपुरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या भावाने पोलिसांना तक्रार देत सांगितले की, 16 वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचे लग्न समी आलम सोबत झाले होते. दोघांना दोन मुलीही आहेत. दरम्यान, समी लग्नाच्या दोन वर्षांनंतर एका मुलीला घेऊन पळून गेला होता. जेव्हा त्याला पोलिसांनी पकडले तेव्हा त्याने माफी मागितली. मात्र, तरीही तो सुधरला नाही. तो स्वत:ला पत्रकार म्हणवत बहिणीला धमकी द्यायचा आणि तिच्यासोबत मारहाण करायचा, असे त्याने सांगितले.
advertisement
6 नोव्हेंबरलाही समीने आपल्या पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे तिचा भाऊ तिला दुसऱ्या दिवशी आपल्या घरी घेऊन आला. 8 नोव्हेंबरला समी त्यांच्या घरी आला आणि त्याने याठिकाणी तोडफोड केली. तसेच त्याची पत्नी घरी न परतल्यास तिला तो तलाक देईल, अशी धमकी त्याने कुटुंबाला दिली. त्यामुळे समाजाच्या भीतीने ती सासरी परतली. मात्र, तिला सासरी पोहोचल्यावर मोठा धक्का बसला.
advertisement
समीने दुसरा निकाह केल्याचे समोर आल्यानंतर 9 तारखेला तिने आपल्या पतीला विचारल्यावर त्याने विष सांगत चार गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याला तत्काळ सोबन सिंह जीना बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तेथून त्याला सुशीला तिवारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याने विषाच्या नाहीतर नशेच्या गोळ्या खाल्ल्याचे याठिकाणी समोर आले. 10 नोव्हेंबरला त्या रुग्णालयातून सुटी मिळाली यानंतर त्याने घरी आल्यावर पत्नीला तीन तलाक दिला आणि घरातून बाहेर काढले.
advertisement
याप्रकरणी पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन आरोपी समी आलम, त्याची आी, बहीण आणि भावाविरोधात मारहाण आणि तीन तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती बनभूलपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज भाकुनी यांनी दिली.
Location :
Haldwani Talli,Nainital,Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
November 27, 2024 7:34 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक, निकाहाच्या 16 वर्षांनी दुसरीच्या नादात पत्नीला तलाक, विष घेतल्याचं नाटकही केलं