बायको म्हणाली 'काय नुसतं पबजी खेळताय', नवऱ्याने थेट खूनच केला, मेहुण्याला Whats App वर पाठवला मेसेज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Husband finished Wife for PUBG : लग्नानंतर नेहाचा पती आणि सासरकडील लोक सतत हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ करत होते. आरोपी पतीला पबजी (PUBG) खेळण्याची सवय होती.
PUBG Crime News : ऑनलाईन गेमिंगच्या नादामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं पहायला मिळतं. लहान मुलांपासून ते मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्यांना देखील याचा मोठा नाद आहे. अशातच मध्य प्रदेशच्या रेवामधून नुकतीच एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. एका नवविवाहित महिलेचा दुर्दैवी शेवट यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नवऱ्याला पबजी (PUBG) चा नाद
जिल्हा मुख्यालयातील गुढ कस्बेच्या वॉर्ड नंबर 15 मध्ये ही घटना घडली. या वॉर्डमध्ये नवविवाहितेचा मृतदेह तिच्याच घरी आढळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. मृत महिलेची ओळख नेहा पटेल, पत्नी रणजीत पटेल, अशी झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे 2025 रोजी नेहा आणि रणजीत यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर नेहाचा पती आणि सासरकडील लोक सतत हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ करत होते. आरोपी पतीला पबजी (PUBG) खेळण्याची सवय होती.
advertisement
काय नुसतं पबजी खेळताय. काम धंदा करा...
हुंड्यावरून वाढलेल्या तणावामुळे एकदा नेहाचे कुटुंबीय तिला माहेरी घेऊन गेले होते. मात्र, काही दिवसांनी रणजीत तिच्या सासरी गेला आणि तिला पुन्हा घरी घेऊन आला. 28 तारखेच्या रात्री पुन्हा त्यांच्यात हुंड्यावरून जोरदार भांडण झाले आणि दुसऱ्या दिवशी नेहाच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला. बायकोला नवऱ्याची गेम खेळण्याची गोष्ट खटकत असायची. काय नुसतं पबजी खेळताय. काम धंदा करा.. असं पत्नीने म्हणताच रणजितला संपात अनावर झाला.
advertisement
मेहुण्याला मेसेज केला अन्...
रागाच्या भरात रणजीने नेहाचा गळा दाबला अन् तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला अन् पळून गेला. जाता जाता त्याने मेहुण्याला मेसेज केला अन् आपण पत्नीची हत्या केली असून तिला घेऊन जावा, असा मेसेज केला. नेहाच्या कुटूंबियांनी घरी जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा जमिनीवर मृतअवस्थेत पडली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बायको म्हणाली 'काय नुसतं पबजी खेळताय', नवऱ्याने थेट खूनच केला, मेहुण्याला Whats App वर पाठवला मेसेज!


