Pune News: शेवटची इच्छा काय? सिगारेट, बिअर दिली अन् खड्डा खोदायला लावला, पुण्यातील हत्येची भयानक घटना

Last Updated:

पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Crime: शेवटची इच्छा काय? सिगारेट, बिअर दिली अन् खड्डा खोदायला लावला, पुण्यातील हत्येची भयानक घटना
Pune Crime: शेवटची इच्छा काय? सिगारेट, बिअर दिली अन् खड्डा खोदायला लावला, पुण्यातील हत्येची भयानक घटना
पुण्यात एक धक्कादायक बातमी घडली आहे. विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्या अल्पवयीन मुलाची चाकू आणि कोयत्याने गळा चिरत, डोकं दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. अल्पवयीन मुलाचे नाव अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड असून तो विश्रांतवाडीतल्या टिंगरेनगरात राहायला होता. अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून तब्बल 11 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कटात एका मुलीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
जुन्या वादातून घेतला सूड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश चिंधू आढळ यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि त्यात प्रथमेशच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेचा राग मनात धरून प्रथमेश सूडाच्या तयारीत होता. अमनसिंग नंतर विश्रांतवाडी परिसरात राहायला आला होता. मात्र, तो नेमका कुठे राहतो, याची माहिती प्रथमेशला नव्हती. त्यामुळे त्याने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने एक धक्कादायक कट रचला. अमनसिंगची हत्या प्रथमेश चिंधू आढळ आणि नागेश बालाजी धबाले या दोघांनी केली असून गुन्ह्यात 9 जणांनी त्यांना साथ दिली.
advertisement
इन्स्टाग्रामवर मैत्री, प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा
आरोपींनी संबंधित मुलीला अमनसिंगशी इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यास सांगितले. “फक्त धमकावायचं आहे,” असे सांगत त्यांनी तिला विश्वासात घेतले. या बनावट मैत्रीत अमनसिंग अडकला आणि त्याला भेटीसाठी खेड शिवापूर परिसरात बोलावण्यात आले. 29 डिसेंबर रोजी अमनसिंग त्या मुलीच्या सांगण्यावरून खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिर परिसरात आला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले. त्याचवेळी नागेश धबाले तेथे पोहोचला आणि अमनसिंगला डोंगराळ भागात घेऊन गेला. तिथे आधीच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर साथीदार दबा धरून बसले होते.
advertisement
“शेवटची इच्छा काय?” विचारून खून
आरोपींनी अमनसिंगला “तुझी शेवटची इच्छा काय?” असा प्रश्न विचारला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने बिअर आणि सिगारेट मागितली. आरोपींनी ती आणून दिली आणि नंतर त्याला स्वतःचा खड्डा खणायला भाग पाडले. आणि त्याला खड्ड्यात पुरून टाकले. पण, तो बाहेर पडेल या भीतीने त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या गळ्यावर त्यांनी ब्लेडने वार केले. त्यांना हे वार कमी वाटले म्हणून त्यांनी थेट कोयत्यानेच गळा चिरला आणि दगडाने डोके ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. अमनसिंगचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्व आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्ड्यात पुरून घटनास्थळावरून पळ काढला.
advertisement
दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार
अमनसिंग घरी परत न आल्याने त्याच्या आईने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. दरम्यान, बुधवारी ७ जानेवारी रोजी खेड शिवापूर परिसरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास करताना पोलिसांनी डोंगराळ भागातून अमनसिंगचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती.
advertisement
सूत्रधार कर्नाटकातून अटकेत
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कर्नाटकातील बेळगाव येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ, त्याचा एक साथीदार आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत प्रथमेशने जुन्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी एकूण 11 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा तरुणांमधील वाढती हिंसक मानसिकता आणि सोशल मीडियाचा गैरवापर किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Pune News: शेवटची इच्छा काय? सिगारेट, बिअर दिली अन् खड्डा खोदायला लावला, पुण्यातील हत्येची भयानक घटना
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement