advertisement

Jalna: मद्यधुंद अवस्थेत बोराडे, महादेवाच्या पिंडीला अलिंगन देतानाचा VIDEO व्हायरल

Last Updated:

Crime in Jalna: जालन्यातील आनवा गावातील कैलास बोराडे याला लोखंडी सळईने चटके दिल्याप्रकरणी जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे.

News18
News18
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालन्यातील आनवा गावातील कैलास बोराडे याला लोखंडी सळईने चटके दिल्याप्रकरणी जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे. याबाबतचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय. निर्दयीपणे चटके दिल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या तीन जणांना अटक केली आहे.
दरम्यान कैलास बोराडे याला चटके देण्याआधीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ बोराडेचेच असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. या व्हिडीओत कैलास बोराडे यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती महादेवाच्या पिंडीला आणि मंदिरासमोरील नंदीला अलिंगन देताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावेळी कैलास बोराडे हा मद्यधुंद अवस्थेत दिसून येत आहे.
advertisement
सध्या कैलास बोराडे यांना चटके दिल्याचं प्रकरणावरून जालना जिल्ह्यात राजकिय तसेच सामाजिक वातावरण गरम झालं आहे. अशा परिस्थितीत हे कैलास बोराडे यांचे मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं संताप व्यक्त होत आहे. आता स्थानिक लोकांकडून कैलास बोराडे याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी होतीय.
दुसरीकडे, कैलास बोराडे यांस गरम सळईने चटके दिल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर जालन्यात आक्रोश बघायला मिळाला होता. वंचित बहुजन आघाडीने ६ मार्चला जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन नेलं होतं. वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन आयोजित केलं होतं. यात कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalna: मद्यधुंद अवस्थेत बोराडे, महादेवाच्या पिंडीला अलिंगन देतानाचा VIDEO व्हायरल
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement