सातारा: 5 वर्षांची चिमुकली आढळली मृतावस्थेत, शेजारच्या अल्पवयीन मुलीचा भयंकर कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News Satara: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका ५ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका ५ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर घराशेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीनेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती रामचंद्र जाधव असं खून झालेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी संस्कृती अचानक राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. ती कुठे गेली, याची कुणालाच काही कल्पना नव्हती. तिचा घरच्यांनी आसपासच्या परिसरात सगळीकडे शोध घेतला, पण ती रात्री उशिरापर्यंत सापडली नाही. शेवटी कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी रात्रभर ड्रोनद्वारे मुलीचा शोध सुरू केला. सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू- पाटील, उप पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाने श्वान पथकाच्या मदतीने रात्रभर शोध सुरू घेतला. दरम्यान, पहाटे पाच वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मयत संस्कृतीच्या घराशेजारी राहणारी मुलगीच तिला घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आलं आहे.
advertisement
त्यावरून पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलीसह आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. आता ही हत्या नेमकी कशामुळे झाली? यामागे नक्की कारण काय होतं? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र अशाप्रकारे पाच वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मयत चिमुकलीवर कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून अन्य कोणते कारण या खुनामागे आहे का? याचा तपास सुरू आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 11, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सातारा: 5 वर्षांची चिमुकली आढळली मृतावस्थेत, शेजारच्या अल्पवयीन मुलीचा भयंकर कांड