Kolkata Doctor Rape Case : कोलकाता रेप-हत्या प्रकरणात नवीन नाव समोर! कोण आहेत डॉ. देबाशिष सोम?

Last Updated:

Kolkata Doctor Rape Case : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

News18
News18
कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यातल्या आर. जी. कर हॉस्पिटलमधल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि नंतर तिच्या झालेल्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी उघड होत आहेत. आता या प्रकरणात एक नवीन नाव समोर आलं आहे. याबाबत रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी मोठा दावा केला आहे. आर. जी. कर रुग्णालयाशी कोणताही संबंध नसतानाही डॉ. देवाशीष शोम घटनास्थळी उपस्थित असल्याचं अली यांनी म्हटलं आहे. त्यामुळे डॉ. देवाशीष शोम कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी दावा केला आहे, की हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर डॉ. देवाशीष गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित होते. एवढंच नाही, तर पोस्टमॉर्टेमच्या वेळीदेखील ते उपस्थित होते.
अख्तर अली यांनी सांगितलं, की देवाशीष शोम हे पश्चिम बंगाल आरोग्य भरती मंडळाचे सदस्य आहेत. पूर्वी ते आर. जी. कर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी होते. सध्या त्यांचा आर. जी. कर हॉस्पिटलशी कोणताही संबंध नाही. त्यांच्याच काळात औषधांच्या खरेदी-विक्रीत हेराफेरी होत असल्याचा आरोप झाला होता. हॉस्पिटलमधल्या कॅफेटेरियाचा मालक चंदन लौह हा माजी प्राचार्य संदीप घोष यांचा अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी होता. हॉस्पिटलमधल्या भ्रष्टाचारात त्यांचाही हात असल्याचा दावा अख्तर अली यांनी केला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
9 ऑगस्ट रोजी आर. जी. कर रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. 8 ऑगस्टच्या रात्री कर्तव्यावर असताना डॉक्टरचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता. या प्रकरणी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक झाली आहे. पीडितेला 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टेममध्ये आढळलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणात असं दिसलं आहे, की संजय रॉय 9 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी इमारतीत घुसला होता. 8 ऑगस्ट रोजी तो चेस्ट विभागात गेला होता आणि पीडित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची पाहणी करत होता. 33 वर्षांचा संजय रॉय 2019 पासून कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Kolkata Doctor Rape Case : कोलकाता रेप-हत्या प्रकरणात नवीन नाव समोर! कोण आहेत डॉ. देबाशिष सोम?
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement