Kolkata Doctor Case : 150mg वीर्य, फ्रॅक्चर बाबत पोलिसांचा मोठा खुलासा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कोलकात्यातील महिला डॉक्टरवर बलात्काराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावरून वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
कोलकाता : कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अनेक दावे फेटाळून लावले आहेत. कोलकात्यातील महिला डॉक्टरवर बलात्काराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावरून वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. पोलीस म्हणाले की, क्रूर गुन्ह्यात बळी पडलेल्या महिला डॉक्टरच्या फ्रॅक्चरबाबत, तिच्या शरीरात आढळलेलं वीर्य याबाबत केले जाणारे काही दावे खोटे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, 31 वर्षीय पीडित महिला डॉक्टरचं शवविच्छेदन मॅजिस्ट्रेटसमोर करण्यात आलं होतं. त्याचं व्हिडीओ शूटिंगही केलं आहे. यात कोणत्याही प्रकारच्या फ्रॅक्चरचा उल्लेख नाही. सोशल मीडिया पोस्ट, विशेषता: पेल्विक गर्डल फ्रॅक्चरसारख्या दुखापतींबाबत जे दावे केले आहेत त्यात तथ्य नाही.
कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटलं की, अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्यानं संशय निर्माण झाला आहे आणि तक्रार दाखल न केल्यानं रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले. प्रक्रियेनुसार पोलीस जेव्हा तक्रार दाखल नसते तेव्हा अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी नोंद करते. अनैसर्गिक मृत्यू प्रकरणात तक्रार किंवा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या प्रकरणी चौकशी करता येते.
advertisement
पीडित महिला डॉक्टरच्या शरीरात १५० ग्रॅम वीर्य आढळलं आणि यावरून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात होती. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी हे फेटाळून लावलं. १५० ग्रॅम वीर्य आढळलं अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. हे माध्यमातून पसरलं आहे आणि लोक यावर विश्वास ठेवतायत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय असंही पोलीस म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 4:14 PM IST