"आपण लग्न करू", असं आश्वासन देत फेसबुक फ्रेंडने ठेवले शारीरिक संबंध, आता देतोय धमकी, तरूणीला हवाय तिचा हक्क

Last Updated:

फेसबुकवरून झांसीच्या तरुणाशी ओळख झाल्यानंतर नोएडाच्या तरुणीचं त्याच्याशी प्रेम जुळलं. दोघंही सात वर्ष एकत्र होते. याच काळात तरुणाने लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र आता...

Facebook love case
Facebook love case
सोशल मीडियावरचं प्रेम किती काळ टिकेल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. कोण कोणला पहिल्यांदा धोका देईल हे सांगता येत नाही. पहिल्यांदा प्रेम केलं जातं, नंतर संबंध ठेवले जातात आणि नंतर सहजपणे एकमेकांना फसवलं जातं. अशी एक घटना तरुणीच्या आयुष्यात घडली आहे. फेसबुकवर एका तरूणावर जीव जडला. तिने सर्वस्व अर्पण केलं आणि त्याने क्षणात विश्वासघात केली.
advertisement
सदर घटना ही झाशीमध्ये घडली आहे. नोएडामधील एका तरुणीची फसवणूक आणि शारीरिक शोषण झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. फेसबुकवर झांसीच्या एका तरुणाशी झालेली मैत्री प्रथम प्रेमात बदलली. एकमेकांसोबत राहण्याची आश्वासनं दिली, 7 वर्षे प्रेम बहरत राहिलं. संबधित तरुणाने सात वर्षे एकत्र जगण्या-मरण्याचे वचन दिले. तरुणीचा विश्वास संपादित केला आणि प्रत्येकवेळी तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत गेला. पण आता हा तरुण स्पष्टपणे लग्न करण्यास नकार देत आहे.
advertisement
न्यायासाठी झांसी गाठलेल्या पीडितेचा आरोप
झांसीला पोहोचलेल्या पीडितेने आरोप केला आहे की, तरुण केवळ तिच्याशी लग्न करण्यास नकार देत नाही, तर जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तो तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहे. सात वर्षे विश्वास ठेवल्याने शोषण झालेल्या पीडितेला आता न्यायासाठी दारोदारी फिरावे लागत आहे. अखेरीस, सोमवारी तिने झांसी एसएसपी कार्यालयात पोहोचून संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आणि कारवाईची मागणी केली.
advertisement
पीडिता म्हणाली की, "तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. तो वारंवार मला लग्न करू असं सांगायचा, याच विश्वासावर मी त्याच्यासोबत सात वर्षे राहिले, पण आता त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे आणि मला बदनाम करण्याची धमकी देत आहे. प्रशासनाकडून मला न्याय मिळावा, अशी मागणी मी करते."
तपासाला सुरुवात
सध्या पोलिसांनी तक्रार दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच योग्य कारवाई केली जाईल. या घटनेमुळे सोशल मीडियावर तयार होणारे संबंध किती धोकादायक ठरू शकतात, याचा पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे, जेव्हा त्यांची पायाभरणी फसवणूक आणि धोक्यावर आधारित असते.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
"आपण लग्न करू", असं आश्वासन देत फेसबुक फ्रेंडने ठेवले शारीरिक संबंध, आता देतोय धमकी, तरूणीला हवाय तिचा हक्क
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement