मंदिरात रक्ताचा सडा! बळी पाहण्यासाठी तो गेला अन् त्याचा हात धडावेगळा झाला, जखमी मुलाच्या आईचा गंभीर आरोप

Last Updated:

छुरिया बाबा मंदिरात शनिवारी बलिदान कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली. काकना गावातील गड्डू यादव मंदिरात बलिदान पाहत असताना शस्त्राचा वार चुकून त्याच्या डाव्या हातावर झाला, आणि त्याचा हात...

Crime News
Crime News
छुरीया बाबा मंदिरात सर्व भक्त बळी देण्यासाठी जमले होते. तिथे एक रहिवासी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला. पण त्यासोबत अशी भयंकर घटना घडली की, तो एका हाताने कायमचा अपंग होऊन बसला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना आहे झारखंड मधील ककना गावातील. काझिया नदीजवळ असलेल्या छुरीया बाबा मंदिरात शनिवारी बळीच्या कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी घडली, जेव्हा भाविक मंदिरात बळी देण्यासाठी जमले होते. ककना गावातील रहिवासी गुड्डू यादव मंदिराच्या आवारात बळीचा कार्यक्रम पाहत होता. पण अचानक, बळीसाठी वापरले जाणारे धारदार शस्त्र चुकले आणि गुड्डूच्या डाव्या हातावर पडले. या घटनेत गुड्डूचा हात शरीरापासून वेगळा झाला.
advertisement
जखमी तरुणाच्या आईचा घातपाताचा आरोप
घटनेनंतर गुड्डू यादवची आई पार्वती देवी हिने गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, चिलोना गावातील रहिवासी रामकुल यादव याने तिच्या मुलाच्या हातावर ठरवून वार केले आहेत. पार्वती देवीने दावा केला की रामकुलने यापूर्वीही तिच्या मुलावर हल्ला केला होता, ज्यामुळे त्याचा पाय मोडला होता. त्यावेळीही तिने पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. या वेळी जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी रामकुलने बळीच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने शस्त्राने हल्ला केला.
advertisement
आरोपी मद्यधुंद, जुन्या वादावरून केला वार
कुटुंबीयांनी सांगितले की, "रामकुल अनेकदा मद्यधुंद असतो आणि त्याच नशेत त्याने वार केला आहे. त्यांनी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे." घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या मदतीने गुड्डू यादवला तातडीने गोड्डा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला भरती करण्यात आले आहे.
advertisement
शनिवारी बळी देण्यासाठी भाविकांची गर्दी
प्रत्येक शनिवारी छुरीया बाबा मंदिरात बळी देण्यासाठी दूरदूरहून भाविक येतात. आजही पाठा बळीच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. याच दरम्यान ही दुर्घटना घडली, ज्यामुळे धार्मिक वातावरणात भीती आणि तणाव पसरला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मंदिरात रक्ताचा सडा! बळी पाहण्यासाठी तो गेला अन् त्याचा हात धडावेगळा झाला, जखमी मुलाच्या आईचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement