लग्नानंतर सासरच्यांनी 'काली' नाव ठेवलं, नवविवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dark complexion woman end life : सासरच्यांनी तिचं नाव काली ठेवलं. ते तिला याच नावाचे हाक मारायचे. यानंतर वैतागून महिलेने लग्नाच्या 4 महिन्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. तिनं गळफास घेतला.
बंगळुरू : लग्नानंतर बहुतेक महिलांचं नाव बदललं जातं. नवरा आणि त्याचं आडनाव जोडताना महिलेचं मूळ नावही बदललं जातं. अशीच एक महिला जिचं 4 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. सासरच्यांनी तिचं नाव काली ठेवलं. ते तिला याच नावाचे हाक मारायचे. यानंतर महिलेनं तिचं आयुष्य संपवून टाकलं आहे.
कर्नाटकच्या गदगमधील ही धक्कादायक घटना आहे. 24 वर्षीय महिला जिचं नाव पूजा. 4 महिन्यांपूर्वीच तिचं अमरेश नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर तिनं आत्महत्या केली आहे. 15 एप्रिलला सासरच्या घरी तिनं गळफास घेतला.
advertisement
मुलीच्या पालकांनी तिच्या मृत्यूसाठी तिचे सासरचे लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तिच्या सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या आई-वडिलांनी तक्रार दिली आहे. पूजाची सासू शशिकला आणि नवऱ्याचा मोठा भाऊ वीरनगौडा तिला त्रास द्यायचे. काळी म्हणून टोमणे मारायचे. इतकंच नव्हे तर तिचं नावही काली ठेवलं होतं. ज्यामुळे ती दुःखी होती.
advertisement
नवभारत टाइम्सने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमरेश एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. त्याचं ट्रान्सफर होणार होतं. त्यानंतर तो पूजाला आपल्यासोबत घेऊन जाणार होता. त्याने पूजाला थोडा संयम ठेवायला सांगितला होता पण तिनं टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा तपास अद्याप करत आहेत. पोलिसांनी तिची सासू आणि दीर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
view commentsLocation :
Karnataka
First Published :
April 21, 2025 1:53 PM IST


