आधी मुलाला दिला जन्म अन् मग फरार झाली आई, तिनं असं का केलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Mother absconding - दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न शांति देवीसोबत झाले होते. शांतीने रात्री 8 नोव्हेंबर रोजी एका बाळाला जन्म दिला. तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. यानंतर तिला आणि बाळाला वार्डमध्ये भरती करण्यात आले होते.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी : नवजात मुलाच्या जन्मानंतर त्याला आपल्या आईसोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला जन्म दिल्यावर आई फरार झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
उत्तरप्रदेशच्या झाशी येथील ही घटना आहे. आईसाठी आपले अपत्य हे सर्वस्व असते. मात्र, एका कलयुगातील आईने आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला एकटे सोडून ती फरार झाली. नवजात बाळ हे अद्याप रुग्णलयात दाखल आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून त्याची आई गायब झाली असून तिचा काहीच शोध लागत नाही आहे. याप्रकरणी नवजात बालकाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.
advertisement
कृपाराम नावाचा व्यक्ती हा गरौठा पोलीस ठाणे हद्दीतील गोरपुरा गावातील रहिवासी आहे. दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न शांति देवीसोबत झाले होते. शांतीने रात्री 8 नोव्हेंबर रोजी एका बाळाला जन्म दिला. तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. यानंतर तिला आणि बाळाला वार्डमध्ये भरती करण्यात आले होते.
advertisement
गुरुवारी सकाळी तो सकाळी शौचालयासाठी गेला होता. मात्र, जेव्हा तो परत आला तेव्हा त्याची पत्नी बेडवर नव्हती. यानंतर त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही. यानंतर त्यांनी नवाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती देत याबाबतची तक्रार दाखल केली, अशी माहिती कृपाराम यांनी दिली. तिने असा निर्णय का घेतला अद्याप याची माहिती समोर आलेले नाही.
advertisement
मागील 2 दिवसांपासून त्याची पत्नी गायब आहे. तर नवजात मुलावर उपचार सुरू आहेत. त्याला आईचे दूध मिळत नसल्याने तो रडत आहे. तर पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपास असून महिलेचा शोध लवकरच घेतला जाईल असे पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
Location :
Jhansi,Uttar Pradesh
First Published :
November 16, 2024 12:48 PM IST