Nagpur Crime : मैत्रीच्या मस्करीचा थरार, जिवलग मित्राच्या खोडीनं गमावला जीव! नागपुरात धक्कादायक घटना
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nagpur Crime news : जवळच्या मित्राने केलेली मस्करी सहन न झाल्याने मित्रालाच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जितू राजू जयदेव असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव इतवारीदास आहे.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर: मित्रांमध्ये अनेकदा थट्टा-मस्करी चालते. मैत्रीत थट्टा मस्करीशिवाय रंगतही येत नाही असे म्हणतात. मात्र, हीच थट्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली आहे. जवळच्या मित्राने केलेली मस्करी सहन न झाल्याने मित्रालाच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जितू राजू जयदेव असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव इतवारीदास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मस्करीत मोबाईल लपवला अन् होत्याचं नव्हतं झालं...
नागपूरातील परडी परीसरात ही दुर्देवी घटना झाली. मोबाईल लपवल्यावरून सुरू असलेल्या टिंगल-टवाळीचे रुपांतर वादात झाले. एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दांड्याने मारून त्याचे डोके फोडले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. जितू राजू जयदेव असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. इतवारीदास शिवदास माणिकपुरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितू आणि इतवारीदास हे जुने मित्र असून मजुरीचे काम करतात. नवीननगर परिसरात जितूचे दुसरे मित्रही राहतात. सर्वजण एनआयटी गार्डनजवळ बसून गप्पा-गोष्टी करीत होते. या दरम्यान मित्रांनी गंमत म्हणून जितूचा मोबाईल लपवला.
advertisement
संतापाने मित्रालाच संपवलं...
इतवारीदासने आपला मोबाईल पाहिला असता तो मिळाला नाही. त्यामुळे इतवारीदासचा पारा चांगलाच चढला. त्याने रागच्या भरात येऊन जितूच्या डोक्यावर लाकडी दाडाने वार केले. या भीषण हल्ल्यात जितूचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परडी पोलीसांनी आरोपी इतवारीदासला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 15, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur Crime : मैत्रीच्या मस्करीचा थरार, जिवलग मित्राच्या खोडीनं गमावला जीव! नागपुरात धक्कादायक घटना








