गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार, मग धमकी देत केला गर्भपात अन् ठेवले पुन्हा संबंध; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
नांदेड: माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकांने गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. शिक्षकाने विद्यार्थीनीला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर एकदा नाहीतर अनेकवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नंतर आरोपीने वारंवार मुलीवर अत्याचार केले. त्यातून विद्यार्थिनी गरोदर राहिली तिचा गर्भपात देखील करण्यात आला . ही घटना मुलींच्या कुटुंबीयांना कळाली, त्यानंतर त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. नंतर मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षक राजू सिंग चौहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा बंद पाळण्यात आला . नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली .
advertisement
मुलीने घडलेला प्रकार सांगितला
समोर आलेल्या माहितीनुसार, नराधम शिक्षक हा विद्यार्थिनीच्या शाळेतच शिकवत होता. त्याने मुलीला पाण्यातून औषध देत अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. वारंवार संबंध ठेवल्याने विद्यार्थिनी गरोदर देखील राहिली. या संदर्भात घरी कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी देत पुन्हा अत्याचार करत असे. गरोदर राहिल्यानंतर देखील मुलीला धमकी देत नराधम शिक्षकाने तिचा गर्भपात केला. या सगळ्या प्रकारानंतर मुलगी प्रचंड घाबरली होती, शंका येताच कुटुंबियांनी मुलीला विश्वासात घेतले. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
advertisement
शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर आरोपी शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी, पालकांनी केली आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 12, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार, मग धमकी देत केला गर्भपात अन् ठेवले पुन्हा संबंध; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं