सांगलीत रक्तरंजित थरार, गुन्हेगाराचा पाठलाग करून खेळ खल्लास, कोयत्याने गळा चिरला अन्...

Last Updated:

Crime in Sangli: सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका टोळीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पाठलाग करून निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
असिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली: सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका टोळीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पाठलाग करून निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी गळ्यावर मानेवर आणि डोक्यावर कोयता आणि दगडाने वार करून ही हत्या केली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की संबंधित गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अशाप्रकारे दिवसाढवळ्या खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सौरभ बापू कांबळे असं हत्या झालेल्या २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो सांगली शहरातील जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवासमधील रहिवासी होता. मयत सौरभ याचा भाऊ देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कळंबा कारागृहात शिक्षा आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या एका वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली असून तेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास परिसरात भावासोबत राहत होता. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे दाखल आहेत. संशयित हल्लेखोर आणि सौरभ यांच्यात आठ दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग संशयितांच्या मनात होता. शनिवारी दुपारी सौरभ आणि त्याचे काही मित्र वाल्मिकी आवासमध्ये थांबले होते. यावेळी मागील बाजूच्या शेतातून संशयित हल्लेखोर त्याच्या दिशेने आले.
advertisement
हल्लेखोर येत असल्याचे पाहून सौरभने मित्रांना बाजूला पाठविले. त्याचे मित्र जाताच संशयितांची सौरभ याच्याशी वादावादी झाली. त्यानंतर सौरभ तेथून बिल्डिंग क्रमांक सात येथे पळत आला. संशयितांनी त्याला गाठून कोयता आणि दगडाने मारहाण केली. कोयत्याचा वार गळ्यावर वर्मी बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. पण अशाप्रकारे दिवसाढवळ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
सांगलीत रक्तरंजित थरार, गुन्हेगाराचा पाठलाग करून खेळ खल्लास, कोयत्याने गळा चिरला अन्...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement