Yashashree Shinde : यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट, दाऊद शेखची पोलीस कोठडीत रवानगी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता एससी, एसटी कायद्यांतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
प्रमोद पाटील, पनवेल : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलीय. यशश्रीची हत्या करणाऱ्या दाऊद शेख याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता एससी, एसटी कायद्यांतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
उरणमध्ये यशश्री शिंदे हिचा आरोपी दाऊदने निर्घृण खून केला. त्याने यशश्रीला भेटण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले. याआधीही आरोपी दाऊद याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो यशश्रीला त्रास देत होता अशी माहिती समोर आलीय.
आरोपी दाऊद शेख हा यशश्रीच्या हत्येनंतर कर्नाटकात पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन त्याला अटक केली. आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिलीय. आरोपी फरार झाल्यानंतर त्याचं लोकेशन सापडत नव्हतं. मात्र त्याच्याच ओळखीच्या व्यक्तीने दाऊदबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतलं.
advertisement
दाऊद आणि यशश्री हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये दोन ते तीन वर्षांपासून काहीच संपर्क नव्हता. दोघांनी एका ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं त्यावेळी मोठा वाद झाला. या वादानंतरच दाऊदने हत्या केल्याचा अंदाज असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Yashashree Shinde : यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट, दाऊद शेखची पोलीस कोठडीत रवानगी