AK 47 ने गोळी स्वत:वर गोळी झाडून पोलीस हवालदाराने संपवलं आयुष्य, गोंदिया हादरलं

Last Updated:

गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ज्यात स्वतः पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने गोळी झाळून आत्महत्या केली.

(गोंदियातील घटना)
(गोंदियातील घटना)
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.नवेगावबांध  जवळील एओपी धाबेपवणी येथील घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्तात आहे. मात्र ट्रान्सफर झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये माओवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आल्या आहेत. अशातच नवेगावबांध पोलीस स्टेशनजवळ असलेल्या धाबेपवनी येथील एओपीमधील कार्यरत असलेले हेड-कॉन्स्टेबल पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट (५० वर्ष रा. संबूटोला/कडीकसा तालुका देवरी जिल्हा गोंदिया, बक्कल क्रमांक २४) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
जयराम कोरेट यांनी आपल्याजवळ असलेल्या AK 47 बंदूकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. काही दिवसांपूर्वीच जयराम कोरेट यांची बदली तिरोडा पोलीस स्टेशन इथं झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण पोलिसांनी याबद्दल दुजोरा दिलेला नाही.
advertisement
या घटनेचा तपास नवेगावबांध पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षका योगिता चापले या करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ज्यात स्वतः पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने गोळी झाळून आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
AK 47 ने गोळी स्वत:वर गोळी झाडून पोलीस हवालदाराने संपवलं आयुष्य, गोंदिया हादरलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement