हुंड्यात 15 तोळं सोनं, 35 लाखात आलिशान लग्न! सासरच्या जाचाला कंटाळून प्रेग्नेंट सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीने संपवलं आयुष्य

Last Updated:

Pregnant software engineer ends life : लग्नापूर्वी मृत शिल्पाने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली होती आणि इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती, तर प्रवीण ओरेकलमध्ये नोकरी करत होता.

Pregnant software engineer ends life
Pregnant software engineer ends life
Dowry Suicide Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. अशातच आता एक हुंडाबळीचं प्रकरण समोर आलं आहे. दक्षिण बेंगळुरूमधील सुद्दागुंटेपल्या येथील राहत्या घरी एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिक महिलेचा मृतदेह फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला. सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी सतत छळ होत असल्याने गरोदर असलेल्या या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीने स्वत:ला संपवल्याचं समोर आलं आहे.

इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर

लग्नापूर्वी मृत शिल्पाने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली होती आणि इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती, तर प्रवीण ओरेकलमध्ये नोकरी करत होता. मात्र, प्रवीणने लग्नानंतर वर्षभरात नोकरी सोडली. त्यानंतर त्याने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला होता.

15 लाख रोख, 150 ग्रॅम सोन्याचे दागिने

advertisement
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवीणच्या कुटुंबाने सुरुवातीला लग्नादरम्यान 15 लाख रुपये रोख, 150 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि घरगुती वस्तूंची मागणी केली होती, परंतु या मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर देखील मुलीचा छळ होत होता, असं शिल्पाच्या पालकांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी घरगुती हिंसाचारासह हुंडा छळाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल

advertisement
त्वचेच्या रंगावरून तिचा अपमान करण्यात आला. तू काळी आहेस म्हणत तिला सतत हिणवलं जात होतं. तू माझ्या मुलासाठी योग्य नाही, त्याला सोडून दे, आम्ही त्याला दुसरी मुलगी बघतो, असं म्हणत सासूने तिचा छळ केला होता. पोलिस ठाण्यात हुंडा छळ आणि अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीणला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त या प्रकरणात कसून चौकशी करत आहे.
advertisement

शिल्पावर घरगुती हिंसाचार

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी प्रवीणच्या कुटुंबाने त्याच्या व्यवसायासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती, जी शिल्पाच्या कुटुंबाने मागणी पूर्ण देखील केली होती. त्यानंतर देखील शिल्पावर घरगुती हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिल्पाच्या सासरच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
हुंड्यात 15 तोळं सोनं, 35 लाखात आलिशान लग्न! सासरच्या जाचाला कंटाळून प्रेग्नेंट सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीने संपवलं आयुष्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement