आधी घेरलं मग सरेंडर करायला लावलं पण.., पुण्यातील गुंडाचं सोलापुरात एन्काऊंटर, इनसाईड स्टोरी समोर!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Encounter in Solapur: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ रविवारी पहाटे गोळीबाराचा थरार झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा एन्काऊंटर केला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ रविवारी पहाटे गोळीबाराचा थरार झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं एन्काऊंटर झालेल्या 23 वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री सोलापूर पोलीस शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी सराईत गुन्हेगार शाहरूख शेख यांचं एन्काऊंटर केलं आहे.
यानंतर आता घटनास्थळी पोलीसांची फॉरेन्सिक टीम दाखल झालीय. सोलापुरातल्या लांबोटी गावाजवळील चंदन नगर येथे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पहाटे साडेतीन वाजता पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली. यानंतर झालेल्या गोळीबारात शाहरूख शेखचा एन्काऊंटर करण्यात आला. याबाबतची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार शाहरूख शेख हा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाजवळील चंदननगर परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या महितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. यासाठी त्यांनी सोलापूर पोलिसांची देखील मदत घेतली. ज्यावेळी पोलीस पथक शेख लपून बसलेल्या घराजवळ आलं. तेव्हा त्यांनी घराला चहुबाजूने घेरलं. तसेच आरोपीला सरेंडर करण्याच्या सूचना दिल्या.
advertisement
पोलिसांच्या सापळ्यात अडकल्याचं समजताच आरोपी शेख बिथरला, त्याने पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी एकूण 4 गोळ्या फायर केल्या. या गोळ्या शेखच्या पायासह शरीराच्या इतर भागावर लागल्या. यातच तो जखमी झाला. या घटनेवेळी आरोपी शाहरुख सोबत त्याची पत्नी आणि दोन मुले होती. सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस, पुणे क्राईम ब्रांच, फॉरेन्सिक टीम आणि बीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
June 15, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आधी घेरलं मग सरेंडर करायला लावलं पण.., पुण्यातील गुंडाचं सोलापुरात एन्काऊंटर, इनसाईड स्टोरी समोर!










