Pune Crime : पुण्यात धक्कादायक घटना, 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला,पोलिसांना हत्येचा संशय, प्रकरण काय?
- Published by:Prashant Gomane
- Written by:Sachin Jire
Last Updated:
पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत ऊसाच्या शेतात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Crime News : सचिन तोडकर, शिरूर/पुणे : पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत ऊसाच्या शेतात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराम टेके (वय 50) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. टेके यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे हत्येचा संशय येतोय. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनेचा तपास सूरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवराम टेके हे मंगळवारी सकाळी 9 वाजता घराबाहेर पडले होते.त्यानंतर नातेवाईकांच्या मते साडेदहा वाजेपर्यंत त्यांचा फोन चालू होता.पण त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.त्यानंतर दिवसभर ते घरी आलेच नाही,त्यांचा फोनही लागत नव्हता.त्यामुळे मुलांनी त्यांची शोधाशोध सूरू केली होती.
या दरम्यान फाकटे येथील तरूणाने देवराम केटे यांना गणेश नगर गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिले होते.त्यामुळे कुटुंबियांनी बुधवारी त्या रस्त्यावर शोधाशोध करायला सूरूवात केली होती.यावेळी कवठे येमाई येथील गांजेवाडी रोडवरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली होती.त्यानंतर अर्धाकिलोमीटर पुढे गेल्यावर ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी मृतदेहाच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठिवर जखमा आढळल्या आहेत, त्यामुळे खुनाचा संशय व्यक्त होतं आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सूरूवात केली आहे. तसेच देवराम टेके यांच्या डोक्यावरती जखमा आढल्याने त्याची हत्या करत मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच नेमके ही हत्या कोणी केली? का केली? याचा कसून तपास शिरूर पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 20, 2025 8:17 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Pune Crime : पुण्यात धक्कादायक घटना, 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला,पोलिसांना हत्येचा संशय, प्रकरण काय?