रॅपिडो वाला विशाल, फॅक्ट्री बॉय राज आणि बेरोजगार आकाश... काही संबंध नसताना तिघांनी सोनमची साथ का दिली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Raja Raghuwanshi Murder Case : सोनमने तिघांची कमकुवत बाजू समजून घेतली अन् तिघांना आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं. नेमकं काय काय झालं होतं? सोनम तिघांचा ब्रेनवॉश कसा केला? जाणून घ्या.
Murder Case person who supported Sonam : इंदोरच्या राजा सुर्यवंशी हत्या प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमचे आरोपी तरुणांपैकी एकासोबत प्रेमसंबंध होते, ज्यामुळे तिने तिच्या पतीला हनिमूनच्या बहाण्याने मेघालयला नेलं आणि त्याची हत्या केली. सोनमच्या प्रेमीने म्हणजेच राज कुशवाह याने राजाला संपवण्याचा प्लॅन केला. राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश आणि आनंद, अशी चारही आरोपींची नावं आहेत. सोनमने उर्वरित तिघांना आपल्या बाजूने कसं वळवून घेतलं आणि राजाचा काटा कसा काढला? जाणून घ्या सविस्तर
राज कुशवाहा - मूळचा उत्तर प्रदेशचा राज कुशवाहा काही वर्षांपूर्वी इंदूरमध्ये राहायला आला होता. सुरुवातीला राज गोविंद नगरमध्ये भाड्याने राहत होता. त्यानंतर त्याला सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात नोकरी मिळाली आणि तो बाणगंगाजवळच्या भाड्याच्या घरात राहू लागला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी त्याची आईही त्याच्यासोबत राहत होती, पण काही काळापूर्वी ती परत उत्तर प्रदेशला गेली. सोनम आणि राज कुशवाहा यांच्या प्रेमसंबंधांना एक वर्षही झालं नाही.
advertisement
विशाल चौहान- विशाल चौहान हा राज कुशवाहाच्या शेजारी राहतो आणि तो राजचा चांगला मित्र होता. मित्रासाठी विशालने जोखीम पत्करली अन् शेवटी हात रक्ताने लाल केले. विशाल रॅपिडो बाईक चालवतो आणि त्याच्या कुटुंबासह राहतो.
आकाश राजपूत- या प्रकरणातील तिसरा आरोपी आकाश राजपूत बेरोजगार आहे. तो राजच्या परिसरातही राहत होता. त्यामुळे राज कुशवाहा त्याला चांगलं ओळखत होता. याचा फायदा घेत सोनमने त्यांना पैशाचे आमिष दाखवून योजनेत सहभागी करून घेतले. सोनमने सुमारे १० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
advertisement
आनंद - या प्रकरणाती चौथा आरोप आनंद याच्याविषयी जास्त माहिती नाही. हा देखील राज कुशवाहाच्या जवळचा मानला जातोय. आनंद हा देखील इतर दोघांप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट किलर होता, अशी माहिती समोर आली आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 10, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
रॅपिडो वाला विशाल, फॅक्ट्री बॉय राज आणि बेरोजगार आकाश... काही संबंध नसताना तिघांनी सोनमची साथ का दिली?