Dog Attack : रॉटविलरची 4 महिन्यांच्या ऋषिकाच्या अंगावर झडप, लचके तोडून जीव घेतला, अंगावर काटा आणणारा Video

Last Updated:

रॉटविलर जातीच्या पाळीव कुत्र्याने चार महिन्यांच्या मुलीवर हल्ला केला आहे, ज्यात चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

रॉटविलरची 4 महिन्यांच्या ऋषिकाच्या अंगावर झडप, लचके तोडून जीव घेतला, अंगावर काटा आणणारा Video
रॉटविलरची 4 महिन्यांच्या ऋषिकाच्या अंगावर झडप, लचके तोडून जीव घेतला, अंगावर काटा आणणारा Video
अहमदाबाद : रॉटविलर जातीच्या पाळीव कुत्र्याने चार महिन्यांच्या मुलीवर हल्ला केला आहे, ज्यात चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबादच्या हाथीजन सर्कलजवळ राधे रेसिडेन्सीमध्ये एका रॉटविलरने चार महिन्यांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला. सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. कुत्र्याची मालकीण त्याला घेऊन जात असताना कुत्रा मालकाच्या हातातला पट्टा सोडून पळाला, तेव्हा बाळाची काकू बाळाला उचलून उभी होती, पण कुत्र्याने काकूकडून बाळ खेचून घेतलं आणि बाळावर हल्ला केला.
कुत्र्याच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं, पण गंभीर जखमा झाल्यामुळे तिला वाचवता आलं नाही. कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यानंतर सोसायटीमध्ये तणाव आहे. मुलीचे वडील अजित डाभी एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. सुरूवातीला मुलीच्या वडिलांनी तक्रार करायला तसंच आपल्या मुलीचं पोस्टमॉर्टम करायला नकार दिला होता.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी रात्री 9 वाजता घडली. सोसायटीमध्ये राहणारी महिला तिच्या कुत्र्याला घेऊन बाहेर जात होती, तेव्हाच मुलीची काकू तिला घेऊन बाहेर आली. सोसायटीमधल्या सिमेंटच्या खूर्चीवर काकू 4 महिन्यांच्या मुलीला घेऊन बसली होती, तेव्हाच कुत्र्याचा ताबा सुटला आणि त्याने चिमुरडीवर थेट हल्ला केला. हा कुत्रा त्याच सोसायटीमधल्या दिलीप पटेल यांचा होता. पटेल यांची मुलगी रॉटविलर कुत्र्याला सोबत घेऊन बाहेर पडली तेव्हा ती फोनवर बोलत होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. फोनवर बोलत असताना लक्ष नसल्यामुळे कुत्र्याचं नियंत्रण सुटल्याचा आरोपही सोसायटीमधील रहिवाशांनी केला आहे.
advertisement

बाळ-काकू जमिनीवर पडल्या

कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतानाही त्याने 4 महिन्यांची ऋषिका आणि तिच्या काकूवर हल्ला केला. या हल्ल्यात काकू आणि ऋषिका खाली पडले आणि काही सेकंदामध्ये कुत्र्याने ऋषिकावर झडप टाकली आणि तिचे लचके तोडायला लागला. जखमी अवस्थेमध्येच ऋषिका आणि तिच्या काकूला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी ऋषिकाला मृत घोषित केलं. पटेल यांचा कुत्रा तीन ते चार वेळा अशाप्रकारे आक्रमक झाल्याचा आरोप ऋषिकाचे काका राजू डाभी यांनी केला आहे. तसंच कुत्र्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Dog Attack : रॉटविलरची 4 महिन्यांच्या ऋषिकाच्या अंगावर झडप, लचके तोडून जीव घेतला, अंगावर काटा आणणारा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement