सोलापुरात 8 वर्षांच्या चिमुरडीसोबत काय घडलं? दफन केलेला मृतदेह संशयावरून बाहेर, वडिलांनीच..
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Crime: सोलापुरात वर्षीय चिमुकलीचा दफन केलेला मृतदेह संशयावरून बाहेर काढण्यात आला आहे. पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीये.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 8 वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी दफन केलेला मृतदेह संशयावरून पोलिसांनी बाहेर काढला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील कोठे वस्तीवर ही घटना घडली. श्रावणी ओगसिद्ध कोठे असे मृत चिमुकलीचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडिलांनी हत्या केली?
कुसूर येथील कोठे वस्तीवर ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे हे कुटुंबासह राहतात. या ठिकाणी त्यांची मुलगी श्रावणी (वय 8 वर्षे) हिला कोणत्या तरी कारणावरून मारून तिचा मृतदेह दफन केला आहे, अशी माहिती कुसूरच्या पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी याबाबत माहिती मंद्रूप पोलिसांना कळवली. याबाबत माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
advertisement
खून की मृत्यू? तपास सुरू
श्रावणी हिला वडिल ओगसिद्ध कोठे यानेच मारल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली. त्यानुसार मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. श्रावणीचे वडील ओगसिद्ध यांनी श्रावणीला फीट आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि आपण दफन केल्याचे सांगितले. परंतु, शवविच्छेदनानंतरच श्रावणीसोबत नेमकं काय घडलं? तिचा खून झाला की मृत्यू हे पुढे येणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 24, 2025 10:39 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सोलापुरात 8 वर्षांच्या चिमुरडीसोबत काय घडलं? दफन केलेला मृतदेह संशयावरून बाहेर, वडिलांनीच..