advertisement

सख्खा भाऊ झाला वैरी! अवघ्या 500 रुपयांसाठी घातला डोक्यात दगड, सोलापुरातील प्रकार

Last Updated:

Solapur Crime: सोलापुरात फक्त 500 रुपयांच्या वादातून सख्खे भाऊच पक्के वैरी झालेत. पैशाच्या वादातून डोक्यात दगड घातल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.

सख्खा भाऊ झाला वैरी! 500 रुपयांसाठी भावाच्याच डोक्यात घातला दगड, सोलापुरातील प्रकार
सख्खा भाऊ झाला वैरी! 500 रुपयांसाठी भावाच्याच डोक्यात घातला दगड, सोलापुरातील प्रकार
सोलापूर : आपल्याकडे भावकीचा वाद नवा नाही. सोलापुरात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून अवघ्या पाचशे रुपयांसाठी सख्ख्या भावाने भावाच्याच डोक्यात दगड घातला. यामध्ये नेताजी लक्ष्मण मोरे (वय 50) गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी तानाजी लक्ष्मण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
नेताजी मोरे हे 22 मार्च रोजी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करून हातपाय धुवूत होते. तेव्हा सख्खा भाऊ तानाजी मोरे तेथे आले. दोघांच्या शेतात सामाईकमध्ये बसविलेले एम.एस.सी.बी.चे खांब आहेत. या खांबाला तान दिला असून त्यासाठी 1 हजार रुपयांचा खर्च आला आहे. हे पैसे मी भरले असून त्यातील निम्मे पैसे तू दे अशी मागणी केली. त्यावर नेताजी यांनी तानाचे पैसे देत नाही अशी भूमिका घेतली. यावरून दोघांत वाद झाला. तेव्हा तानाजी यांनी शिवीगाळ करत नेताजी मोरे यांच्या शर्टाला धरून डोक्यात दगड घातला. यामध्ये नेताजी जखमी झाले आहेत.
advertisement
गुन्हा दाखल
सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली आहे. नेताजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 बी.एन.एस 115 (2),118(1),351(2),352 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. जखमी फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महिंद्रकर हे करत आहे.
advertisement
दरम्यान, अवघ्या 500 रुपयांसाठी भाऊच भावाचा वैरी बनल्याच्या प्रकाराची पंचक्रोशित चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सख्खा भाऊ झाला वैरी! अवघ्या 500 रुपयांसाठी घातला डोक्यात दगड, सोलापुरातील प्रकार
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement