advertisement

पत्नी-मुलं पाहत राहिली, शिक्षकाने भरधाव रेल्वेसमोर मारली उडी, कारण वाचून बसेल धक्का

Last Updated:

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव रेल्वे स्थानकावर एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका शिक्षकानं आपल्या पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत आयुष्याचा शेवट केला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव रेल्वे स्थानकावर एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका शिक्षकानं आपल्या पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत आयुष्याचा शेवट केला आहे. मयत शिक्षक आपल्या पत्नी आणि मुलांसह आमगाव रेल्वे स्थानकावर उतरला होता. स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भरधाव रेल्वेसमोर उडी मारून आयुष्याचा भयंकर शेवट केला आहे. पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला.
तुलसी परते असं 35 वर्षीय मयत शिक्षकाचं नाव आहे. ते मध्यप्रदेशातील कारंजा येथील रहिवासी होते. तसेच ते विदिशा याठिकाणी शिक्षक म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी तुलसी हे आपली पत्नी आणि मुलांसह मध्यप्रदेशातील कारंजा येथून विदिशा येथे जात होते. त्यासाठी ते आमगाव रेल्वे स्टेशनवर आले होते.
रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तुलसी यांचा आपल्या पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात तुळसी यांनी रेल्वेच्या समोर उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांनी पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत आयुष्याचा शेवट केला. त्यांनी छत्तीसगड एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रेल्वे पोलीस गोंदिया करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नी-मुलं पाहत राहिली, शिक्षकाने भरधाव रेल्वेसमोर मारली उडी, कारण वाचून बसेल धक्का
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement