सातारा एसटी स्टँडवर थरार! भर रस्त्यात नाचवत होता 'नंगी तलवार', पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Last Updated:

28 जुलै रोजी रात्री साताऱ्याच्या एसटी स्टँड परिसरात हातात नंगी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला वाहतूक पोलीस अमर काशीद आणि तानाजी भोंडवे यांनी अत्यंत... 

Satara Crime
Satara Crime
सातारा : 28 जुलैची रात्र. साताऱ्याचे वर्दळीचे एसटी स्टँड परिसर आणि शहरातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मात्र, वाहतूक पोलीस अमर काशीद आणि तानाजी भोंडबे यांच्यासाठी ती रात्र एक थरारक अनुभव घेऊन आली. रात्री साधारण नऊच्या सुमारास त्यांना खबर मिळाली की, सेव्हन स्टार इमारतीच्या जवळ एक तरुण हातात नंगी तलवार घेऊन फिरत आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी त्या व्यक्तीला चालाखीने पकडले
ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता, पोलीस काशीद आणि भोंडबे यांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. काही वेळातच तो तरुण एसटी स्टँड परिसरात त्यांच्या नजरेस पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, दोन्ही पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि धैर्याने त्याला शांत राहण्याचे आवाहन केले आणि मोठ्या चालाखीने त्याला पकडले. त्याच्या हातात असलेली धारदार तलवार जप्त करण्यात आली.
advertisement
वाढदिवसाची भेट होती 'ही' तलवार
या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण विजय बल्लाळ (वय 28, रा. एनकुळ, ता. खटाव) असे नाव असलेल्या या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने जो खुलासा केला, तो धक्कादायक होता. प्रवीणने सांगितले की, तो पुण्याहून ही तलवार आपल्या एका नातेवाईकाच्या वाढदिवसाला 'भेट' म्हणून देण्यासाठी आणली होती.
advertisement
सतर्कतेमुळे टळला अनुचित प्रकार
वाढदिवसाची ही अनोखी आणि तितकीच धोकादायक भेट देण्यापूर्वीच प्रवीण पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये (आर्म ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एक अनुचित प्रकार टळला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सातारा एसटी स्टँडवर थरार! भर रस्त्यात नाचवत होता 'नंगी तलवार', पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement