Satara Crime: अखेर साताऱ्यात 'त्या' टोळीचा गेम ओव्हर! एकूण 23 गुन्ह्यांची झाली उकल, 52 लाखांचं सोनं जप्त!

Last Updated:

साताऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडे आणि सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे. पोलिसांनी 52 लाख रुपये किमतीचे तब्बल...

Satara crime
Satara crime
सातारा : साताऱ्याच्या गल्ल्यांमध्ये आणि रस्त्यांवर गेल्या काही काळापासून एक टोळी धुमाकूळ घालत होती. दरोडे, घरफोड्या, सोनसाखळी चोरून या टोळीने सातारकरांची झोप उडवली होती. पण गुन्हेगारांचे दिवस अखेर संपले, कारण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मोठ्या कौशल्याने 52 लाख रुपये किमतीचे तब्बल अर्धा किलो सोने जप्त केले असून, या कारवाईमुळे त्यांच्याकडून एकूण 23 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सोनारांनाही पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
2 सराईत गुन्हेगार अन् 2 सोनार अटक
सातारा जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे एलसीबीचे पोलीस हैराण झाले होते. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सचिन संत्र्या भोसले हा त्याच्या 7 साथीदारांसोबत दरोडा, सोनसाखळी चोरी आणि घरफोड्या करत आहे. पोलिसांनी त्याच्या मागावर राहण्याचा निर्णय घेतला. सचिन भोसले आणि त्याचा साथीदार नदीम धर्मेंद्र काळे हे जिहे परिसरात येत-जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग काय, पोलिसांनी वेश बदलून या चोरट्यांवर नजर ठेवली. 7 जुलै रोजी अखेर तो क्षण आला. सचिन भोसले त्याच्या मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग केला आणि त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
advertisement
या कारवाई अटक केलेल्यांमध्ये सचिन संत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), नदीम धर्मेंद्र काळे (वय-22, रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली) अशी चोरट्यांची, तरआशिष चंदुलाल गांधी (वय-39, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), संतोष जगन्नाथ घाडगे (वय-48, रा. देगाव, ता. सातारा) अशी सराफांची नावे आहेत.
पोलीस विरुद्ध सोनार समितीचा संघर्ष
चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांनी चोरीचे सोने हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू केला, पण इथेही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संशयितांनी कबूल केले की, त्यांनी चोरीचे सोने जिल्ह्यातील काही सोनारांना विकले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस तपास करत असतानाच सराफ सुवर्णकार समितीच्या काही सदस्यांनी तपासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. उमेश बनहाडे, प्रथमेश नगरकर (रा. पुणे) आणि शशिकांत दीक्षित (रा. सातारा) यांनी गुन्ह्यात समोर आलेल्या सोनारांची दिशाभूल करून त्यांच्यावर दबाव टाकला, जेणेकरून चोरीचे दागिने पोलिसांच्या हाती लागू नयेत. पण पोलिसांना या दबावाला न जुमानता आपला तपास सुरूच ठेवला.
advertisement
7 जणांनी केल्या एकूण 23 चोऱ्या
पोलिसांनी सचिन भोसले आणि नदीम काळे यांना अटक केल्यानंतर त्यांनी 1 दरोडा, 8 सोनसाखळी चोरी, 3 जबरी चोर आणि 8 घरफोड्या आणि 3 इतर चोऱ्या, अशा एकूण 23 गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 52 लाख रुपये किमतीचे 52 तोळे, 1 ग्रॅम 530 मिली एकून अर्धो किलो सोने जप्त केले. याशिवाय, गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि एक कोयताही जप्त करण्यात आला आहे. ही टोळी एकूण सात जणांची होती, त्यापैकी दोघांना आतापर्यंत पकडले आहे. या टोळीने मसूर, उंब्रज, फलटण शहर, मल्हारपेठ, कराड तालुका, कराड शहर, सातारा तालुका, फलटण ग्रामीण, पुसेगाव, लोणंद आणि खंडाळा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले आहेत.
advertisement
या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फाण आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई यशस्वी केली.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
Satara Crime: अखेर साताऱ्यात 'त्या' टोळीचा गेम ओव्हर! एकूण 23 गुन्ह्यांची झाली उकल, 52 लाखांचं सोनं जप्त!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement