What is 19 minutes viral video सोशल मीडियावर का होतंय एवढं ट्रेंड? पाहणं किंवा शेअर करण्यापूर्वी आधी हे वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असाच एक ट्रेंड काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. आश्चर्य म्हणजे भारतीयांनी त्याला सर्वात जास्त गुगलवर देखील सर्च केलं आहे. तो ट्रेंड किंवा शब्द आहे. “19-minute viral video”.
मुंबई : आजकाल सोशल मीडिया म्हणजे माहितीचा, मनोरंजनाचा आणि अफवांचा एक महापूरच झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर आपण फोन हातात घेतला की आपला हात आपोआपच सोशल मीडियावर जातो. आपल्या फीडवर (Feed) कोणता नवा ट्रेंड किंवा मीम (Meme) दिसत आहे, हे लोकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यात कधीकधी सकाळी फोनवर असं काही अचानक ट्रेंड होऊ लागतं ज्याची माहिती आपल्याला नसते. अशावेळी लोक गुगलवर किंवा इतर ठिकाणी या ट्रेंडबद्दल सर्च करत असतात.
असाच एक ट्रेंड काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. आश्चर्य म्हणजे भारतीयांनी त्याला सर्वात जास्त गुगलवर देखील सर्च केलं आहे. तो ट्रेंड किंवा शब्द आहे. “19-minute viral video”.
इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुकसह सर्व प्लॅटफॉर्मवर याच व्हिडिओची चर्चा, विनोद आणि वेगवेगळ्या थिअरीज यांचा पूर आला आहे. पण, हा १९ मिनिटांचा व्हिडिओ नेमका काय आहे? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, या ट्रेंडमुळे तुमच्या आयुष्यात कोणता धोका निर्माण होऊ शकतो? हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हल्ली लोकांना असा व्हिडीओ पाहायला आणि आपल्या मित्रांना शेअर करण्याची सवय झाली आहे. पण हा व्हिडीओ शेअर करणं आणि पाहाणं किती धोक्याचं आहे हे देखील आधी जाणून घ्या. मगच त्याला शेअर करा.
advertisement
इंटरनेटवर सुरू असलेल्या चर्चांनुसार, हा ट्रेंड एका कथित 'अडल्ट' व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये नेमके कोण आहे, याची खरी माहिती कोणालाच माहीत नाही. खरी माहिती उपलब्ध नसल्यामुळे, लोक उत्सुकतेपोटी (Curiosity) हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोशल मीडियावर त्या व्हिडिओतील व्यक्तीला शोधण्याची एक विचित्र मोहीम (Hunt) सुरू झाली आहे, ज्यामुळे अनेक निष्पाप क्रिएटर्सचे (Innocent Creators) नाव यात चुकीच्या पद्धतीने ओढले गेले आहेत.
advertisement
काही लोकांचा दावा आहे की, ही जुनी क्लिप आहे, तर काही युजर्स म्हणतात की, आजकाल डीपफेक्स वेगाने पसरत असल्याने, हा एक AI-generated व्हिडिओ असू शकतो. यामुळे चुकीची ओळख होण्याची शक्यता वाढली आहे.
तुम्हाला देखील हा 'Original 19-minute video' आला असेल किंवा तुम्ही पाहण्याचा विचार करत असाल तर थांबा. सायबर तज्ञांनी या ट्रेंडमुळे वाढलेल्या मोठ्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे.
advertisement
स्कॅमर्स (Scammers) या ट्रेंडचा गैरफायदा घेत आहेत. 'ओरिजनल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा' अशा नावाखाली ते बनावट लिंक्स (Fake Links) मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सायबर तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा संशयास्पद लिंक्सवर क्लिक केल्यास तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर (Malware) किंवा व्हायरस डाउनलोड होऊ शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स किंवा पासवर्ड्स चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा लिंकपासून दूर राहणे आवश्यक आहे.
advertisement
निष्पाप इन्फ्लुएंसरची गमतीशीर प्रतिक्रिया
या संपूर्ण अफरातफरीदरम्यान एका महिला इन्फ्लुएंसरला या व्हिडिओतील मुलगी म्हणून चुकीचे ठरवले गेले. त्यांच्या पोस्टवर '19 minutes' असे लिहून हजारो कमेंट्स येऊ लागल्याने त्रस्त होऊन त्यांनी स्वतः एक व्हिडिओ बनवून त्यावर आपले वक्तव्य दिले.
1.6 कोटी व्ह्यूज मिळालेल्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी विनोदी ढंगात म्हटले: "19 मिनिट 19 मिनिट' का लिहिताय? कोणाचे केलेले प्रकरण माझ्या डोक्यावर का थोपवत आहात? ती मुलगी इंग्रजी बोलते, मी तर 12 वीपर्यंतही शिकलेली नाही..." हा हलका-फुलका विनोद करून त्यांनी एका बाजूला वातावरण शांत केले, तर दुसऱ्या बाजूला हे गंभीर सत्य दाखवले की, सोशल मीडिया चुकीची ओळख (False Identity) पसरवण्यात किती वेगवान आणि निष्काळजी आहे. लोक सत्य न तपासता केवळ ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी कोणतेही पोस्ट करत आहेत, ज्यामुळे निष्पाप लोकांच्या प्रतिमेला (Image) मोठे नुकसान पोहोचू शकते.
advertisement
हा संपूर्ण ट्रेंड हे स्पष्ट करतो की, उत्सुकता आणि अपूर्ण माहिती एकत्र येऊन एक मोठे इंटरनेट वादळ निर्माण करतात, ज्याचा फायदा फक्त स्कॅमर्सना होतो. त्यामुळे कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्यता तपासा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 10:24 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
What is 19 minutes viral video सोशल मीडियावर का होतंय एवढं ट्रेंड? पाहणं किंवा शेअर करण्यापूर्वी आधी हे वाचा


