दारुसाठी पैसे दिल्याने तरुणाचे तोंड, डोकं ठेचलं, दोघांना अटक; सांगली हादरले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारातील नवीन इमारतीच्या बांधकामाच्या पाठीमागील बाजूस एका युवकाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले
सांगली : सांगलीच्या जतमध्ये दारु पाजण्याचे अमिष दाखवत 22 वर्षीय तरुणाला 2 अनोळखी तरुणांनी नग्न करत डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आरोपींनी अटक केली आहे.जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात युवकांची हत्या झाली होती.
जत येथे दारु पिण्यास देतो असे सांगून दोघा अनोळखी युवकांना दुकानाजवळ घेवून जावून पैसे नसल्याचे सांगणाऱ्या युवकास नग्न करुन दोघांनी डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रविंद्र आबासाहेब बंडगर (वय 30) आणि विराज संजय पांढरे (वय 20 दोघेही रा. शिवाजी पेठ, जत ) या दोघांना अटक केली आहे. विकास मलकारी टकले (वय 22, रा. टकलेवस्ती, उमदी, ता. जत ) असे मृत युवकाचे नाव आहे.
advertisement
इमारतीच्या मागील बाजूस केला खून
जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारातील नवीन इमारतीच्या बांधकामाच्या पाठीमागील बाजूस एका युवकाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. सदर युवक नग्न अवस्थेत असून त्याची ओळख पटली नव्हती. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने तपासात सदर मृत युवकाचे नाव विकास टकले असल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
तपासाच्या दृष्टीकोनातून मिळाले धागेदोरे
दरम्यान पोलिसांनी कृषी उत्पन्न आवारातील सीसीटिव्ही तपासले असता मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन तिघेजण बाजार समितीच्या दिशेने जाताना दिसले मात्र वीस मिनिटांनी दोघेच बाहेर येताना दिसले. त्यामुळे पोलिसांना एक तपासाच्या दृष्टीकोनातून धागेदोरे मिळाले. पोलिसांना खबऱ्याच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे जत येथील तुराई प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे संशयित थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघा संशयित युवकांनी खूनाची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:15 PM IST










