आधी प्रेमाच्या आणाभाका, मग ऐनवेळी दगा, सांगलीत तरुणीने लव्ह स्टोरीचा केला भयंकर शेवट

Last Updated:

Crime in Sangli: सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

News18
News18
सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने आधी प्रेमाच्या आणाभाका दिल्या, त्यानंतर ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
सचिन आबासाहेब तवर असं अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. तर करिष्मा अमोल तुपे असं आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मागील काही महिन्यांपासून करिष्मा आणि सचिन प्रेम संबंधात होते. सचिनने करिष्माला लग्नाचं वचन दिलं होतं. पण ऐनवेळी सचिनने दगा दिला. त्याने लग्न करण्यास नकार दिला. सचिनचा या निर्णय करिष्माच्या जिव्हारी लागला आणि ती नैराश्याच्या गर्तेत गेली.
advertisement
यानंतर ८ जुलै रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास करिष्माने खोलीत कुणी नसल्याचं पाहून गळफास घेऊन आयुष्याचा भयावह शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच करिष्माने आत्महत्या का केली? एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू केला.
यावेळी मयत करिष्मा हिचे सचिनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत खोलात जाऊन तपास केला असता सचिनने लग्नास नकार दिल्याच्या कारणातून तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. यानंतर कडेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत तरुणीचे वडील अमोल केशव तुपे (रा. तोंडोली) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
आधी प्रेमाच्या आणाभाका, मग ऐनवेळी दगा, सांगलीत तरुणीने लव्ह स्टोरीचा केला भयंकर शेवट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement