जुन्या वादातून युवकावर तलवारीने वार, थरारक घटना CCTV मध्ये कैद
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोक रागाच्या भराच अनेकदा टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक थरारक घटना समोर आलीय, ज्यामध्ये जुन्या वादातून युवकावर तलवारीने वार करण्यात आले.
मुजीब शेख, नांदेड, 7 नोव्हेंबर : लोक छोट्याशा गोष्टींवरुन भांडण करतात. वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांमध्ये वाद होत असतात. मात्र हे वाद मोठ्या भांडणात, हाणामारीतही बदलताना पहायला मिळतात. लोक रागाच्या भराच अनेकदा टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक थरारक घटना समोर आलीय, ज्यामध्ये जुन्या वादातून युवकावर तलवारीने वार करण्यात आले. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये पुन्हा भांडण झालं आणि त्यानंतर एकानं काही साथीदारांसोबत येऊन दुसऱ्याचा काटा काढला. त्याच्यावर तलवारीनं वार करत जीव घेतला. ही धक्कादायक घटना नांदेडमधून समोर आलीय. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यावर परिसरात भितीचं वातावरण झालं आहे.
advertisement
जून्या वादातून एका युवकावर चार ते पाच जणांनी तलवारीने हल्ला केला. यात एक युवक मरण पावला तर एक जण जखमी झाला. नांदेड शहरातील नांदेड सराफा भागात रात्री ही घटना घडली. सागर यादव आणि केशव पवार यांच्यात वाद होता. काल रात्री केशव पवार आणि सागर यादव यांच्यात सराफा परिसरात पुन्हा भांडण झालं आणि नंतर केशव पवार आपल्या अन्य साथीदारासह आला. आरोपींनी तलवारीनं सागर यादव याच्यावर हल्ला केला. सागरचा भाऊ भानू यादव याच्यावरही हल्ला करण्यात आला. सागरवर आरोपींनी अनेक वार केले.
advertisement
गंभीर जखमी सागरला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत सागर यादव मृत्यू झाला. तर भानू यादव गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतवारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपी केशव पवारचा शोध घेत आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2023 9:30 AM IST