Christmas 2024 Songs: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी 5 धमाकेदार गाणी, मजा आणि मस्तीचा डबल डोस
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Christmas 2024 Songs:ख्रिसमसचा आला आहे आणि सर्वत्र सजवाट आणि प्रकाशमय वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांना ख्रिसमस सण खूप आवडतो. ते एकदम थाटामाटात आणि खास प्रकारे हा दिवस साजरा करतात.
मुंबई : ख्रिसमसचा आला आहे आणि सर्वत्र सजवाट आणि प्रकाशमय वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांना ख्रिसमस सण खूप आवडतो. ते एकदम थाटामाटात आणि खास प्रकारे हा दिवस साजरा करतात. तुम्हालाही हा खास दिवस आवडत असेल आणि तो आणखी खास बनवायचा असेल तर तुमच्या पार्टीमध्ये ही 5 बॉलिवूड गाणी नक्की वाजवा.
ख्रिसमस पार्टीची मजा दुप्पट करण्यासाठी तुम्ही ही 5 गाणी वाजवू शकता. ही 5 गाणी नेमकी कोणती आहेत? यावर एक नजर टाकूया.
व्हॉट झुमका?
हे गाणं रॉकी आणि राणी की प्रेम कहानी या चित्रपटातील आहे. हे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यावर चित्रीत करण्यात आलंय. हे गाणे रिलीज झाल्यापासून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचे आकर्षक बीट्स आणि जबरदस्त ट्यून हे ख्रिसमस पार्टीसाठी योग्य आहेत. ज्यावर तुम्हालाही थिरकायला आवडेल.
advertisement
शो मी द ठुमका
'शो मी द ठुमका' हे बॉलीवूडमधील टॉप गाण्यांपैकी एक आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटातील 'शो मी द ठुमका' हे ख्रिसमस पार्ट्यांमध्ये डान्ससाठी एकदम खास आहे. ख्रिसमसमध्ये डान्स फ्लोरवर एकदम झकास डान्स करु शकता.
झूमे जो पठान
ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण' मधील धमाकेदार गाणे 'झूमे जो पठाण' डान्स फ्लोरसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हे गाणे ख्रिसमस पार्टीत प्रत्येकाला त्यांच्या पायावर नाचायला लावेल. हे गाणे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यावर डान्स करून तुम्ही पार्टीत सर्वांची मने सहज जिंकू शकता.
advertisement
नाटू नाटू
या गाण्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. 2022 मध्ये रिलीज झालेल्या ज्युनियर एनटीआर आणि राम चरणच्या 'आरआरआर' या गाण्याला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. ते तुमच्या ख्रिसमस पार्टीसाठी योग्य आहे. हे गाणे तुम्हाला प्रत्येक तालावर उत्साहाने भरून टाकेल आणि तुम्हाला डान्स फ्लोअरवर नाचण्याची प्रेरणा देईल.
लेके प्रभु का नाम
बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांमध्ये सलमान खानच्या 'लेके प्रभु का नाम'चाही समावेश आहे. हे गाणे 'टायगर 3' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग आहे. ‘लेके प्रभु का नाम’ कोणत्याही पार्टीसाठी योग्य आहे. ख्रिसमसच्या दिवशी हे गाणे वाजवून तुम्ही तुमचे सेलिब्रेशन आणखी खास बनवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 1:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Christmas 2024 Songs: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी 5 धमाकेदार गाणी, मजा आणि मस्तीचा डबल डोस