वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक? मुख्य भूमिकेत कोण? अभिनेत्रीने थेट नावच सांगितलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या बायोपिकबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्याचा कोणी विचारही केला नसेल.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचं नाव माहित नाही असा महाराष्ट्रात कोणी नसेल. आजवर त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठीसह काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. सिनेमांमध्ये ग्लॅमरस पात्र साकारणाऱ्या वर्षा यांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गावरान पण घरंदाज बाईचं पात्र कौशल्याने सर्वांसमोर मांडलं. नुकतंच त्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या टॉप सात स्पर्धकांमध्ये होत्या.
वर्षा उसगांवकर यांनी नुकतंच 'लोकशाही मराठी फ्रेंडली' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक खुलासे केले. यादरम्यान त्यांना त्यांच्या बायोपिकबाबत विचारण्यात आलं. तसेच त्यांना हेही विचारण्यात आलं की, “कोणत्या अभिनेत्रीने तुमची व्यक्तिरेखा साकारायला हवी असं तुम्हाला वाटतं.” त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्याचा कोणी विचारही केला नव्हता.
advertisement
वर्षा उसगांवकरांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असावी यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “हा खूपच कठीण प्रश्न आहे. ती अभिनेत्री माझ्यासारखी दिसली पाहिजे. फक्त घारे डोळे असून चालणार नाही. मला आता तरी तसं कोणी दिसत नाहीये. एक काळ असा होता जेव्हा लोक म्हणायचे की अर्चना जोगळेकर आणि माझ्यात खूप साधर्म्य आहे. मला पुरस्कार मिळाला की लोक तिचे अभिनंदन करायचे. तिला मिळाला तर माझं अभिनंदन करायचे. सध्याच्या घडीला तशी कोणती तरुण अभिनेत्री असती, कोणी तरुण अर्चना जोगळेकर असती, तर मी म्हणाले असते तिला घ्या. पण तिच्यासारखी दिसणारी मला तरी कोणी लक्षात येत नाही आहे. पटकन कोणी डोळ्यासमोर येत नाही.”
advertisement
याव्यतिरिक्त त्यांनी या मुलाखतीत, त्यांच्या 'बिगबॉस'मधील प्रवास आणि इतर स्पर्धकांबद्दलही त्यांचं मत मांडलं. त्यांनी हिंदीतील बड्या स्टार्स, जसे की, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. यावेळी त्यांनी सांगितलं, “मी ऋषी कपूर यांच्यासोबत केवळ 'हनिमून' या एकाच चित्रपटात काम केले आहे. शूटिंगदरम्यान ज्यावेळी ऋषी कपूर सेटवर यायचे तेव्हा जास्त बोलायचे नाहीत, त्यामुळे ते खडूस आहेत असे मला वाटत होतं. पण त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते माणूस म्हणून किती मोठे आहेत.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 2:18 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वर्षा उसगांवकरांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक? मुख्य भूमिकेत कोण? अभिनेत्रीने थेट नावच सांगितलं