इंडस्ट्रीमध्ये आणखी एक Divorce? Bigg Boss फेम कपलमध्ये बाळाच्या जन्मानंतर वाढली भांडणं

Last Updated:

सध्या टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यात दरी वाढत चालली आहे.

दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यात दरी वाढत चालली आहे.
दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यात दरी वाढत चालली आहे.
आजकाल सोशल मीडिया हे असे माध्यम आहे ज्यामुळे चाहत्यांना लोकांच्या प्रेमप्रकरणांपासून ब्रेकअपपर्यंतच्या बातम्या एका क्लिकवर मिळतात. काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या नातेसंबंधांबद्दल उघडपणे लिहितात. अशातच काही विशिष्ट पोस्ट्समधून चाहते सेलिब्रिटी जोडप्यात काहीतरी चुकीचे असल्याचा अंदाज बरोबर लावतात. नताशा-हार्दिकच्या पोस्टवरून चाहत्यांना त्यांच्या नात्यातील दरीचा अंदाज आला आणि ते खरे ठरले. सध्या टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यात दरी वाढत चालली आहे. जेव्हा त्यांचा घरगुती वाद सोशल मीडियावर आला तेव्हा लोकांनी अनेक अंदाज लावायला सुरुवात केली.
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुलीचे पालक झाले. लग्नाच्या अनेक वर्षांनी घरात आलेला हा पाहुणा पाहून त्यांच्या आयुष्यात आनंद वाढेल असे चाहत्यांना वाटले होते, पण तसे झाले नाही. अलीकडेच प्रिन्सला डिलिव्हरीदरम्यान पत्नी युविकासोबत नसल्याबद्दल टार्गेट करण्यात आले होते, त्यानंतर प्रिन्सने सांगितले की युविकाने त्याला डिलिव्हरीबद्दल काहीही सांगितले नव्हते. प्रिन्सच्या ब्लॉगनंतर युविकाने नुकताच एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबियांसोबत डिलिव्हरीबाबत अनेक तपशील शेअर केल्याचा दावा केला आहे.
advertisement

युविकाच्या व्लॉगने खळबळ उडवून दिली

युविकाचा व्लॉग पाहिल्यानंतर प्रिन्स नाराज झाला आणि त्याने तिचे नाव न घेता इंस्टा स्टोरीवर शेअर केली. प्रिन्सची ही पोस्ट केवळ युविकासाठीच होती असे चाहत्यांना वाटते. त्याने नाव न घेता युविकावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. प्रिन्स नरुलाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो युविकाचे नाव न घेता तिला लक्ष्य करताना दिसला. तिचे नाव न घेता, त्याने कमेंट केली की, ''काही लोक निर्दोष दिसण्यासाठी त्यांच्या व्लॉगमध्ये खोटे सांगतात, तर जे गप्प राहतात त्यांना चुकीचे मानले जाते.''
advertisement

प्रिन्स नरुलाने युविकाला लक्ष्य केले

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये प्रिन्सने लिहिले- 'काही लोक व्लॉग्समध्ये खोटे बोलून खरे बनतात. आणि काही लोक गप्प राहिल्यामुळे चुकीचे ठरतात. या युगात नात्यांपेक्षा व्लॉग्स अधिक महत्त्वाचे आहेत.' यासोबतच प्रिन्सने जया किशोरीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये चूक कोणाचीही असो, मानसिक शांतीसाठी गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर कमेंट करताना प्रिन्स म्हणाला, 'अगदी खरे आहे.'
advertisement

जोडप्यामध्ये तणाव कधी सुरू झाला?

मुलीच्या जन्मानंतर युविका आईकडे राहायला गेल्यानंतर या दाम्पत्यामध्ये तणाव निर्माण झाला. युविकाच्या या निर्णयानंतर प्रिंस मुलीच्या जन्माच्या वेळी युविकासोबत नसल्यावरून सोशल मीडियावर प्रिंसला ट्रोल करायला सुरुवात झाली. दरम्यान, प्रिन्सने एक व्लॉग शेअर केला, ज्यामध्ये त्याने सांगितले की युविकाने त्याला डिलिव्हरीच्या तारखेबद्दल सांगितले नव्हते, त्याला याची माहिती दुसऱ्यांकडून मिळाली. तो म्हणाला- 'याआधी मला मुल कधी होणार आहे, हे मला माहीतही नव्हते, मी पुण्यात शूटिंग करत होतो. अचानक मला कोणाकडून तरी कळलं की आज डिलिव्हरी आहे. माझ्यासाठी एक सरप्राईज होतं. कसले सरप्राईज आहे हे मला माहीत नव्हतं. थोडं विचित्र वाटत होतं, म्हणून मी लगेचच आलो. इथे आल्यावर मी माझ्या आई-वडिलांना फोन केला, तर त्यांनाही राग आला.'
advertisement

वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुला झाला ट्रोल

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांचे २०१८ साली लग्न झाले होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे आई-वडील झाले, मात्र युविकाने बाळ झाल्यानंतर थेट आईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिला ४५ दिवस आईच्या घरी रहायचे होते आणि यामुळे प्रिन्स नरुला खूप ट्रोल झाला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
इंडस्ट्रीमध्ये आणखी एक Divorce? Bigg Boss फेम कपलमध्ये बाळाच्या जन्मानंतर वाढली भांडणं
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement