Real or Fake Silver : तुम्ही खरेदी केलेली चांदी खरी आहे की खोटी? सरकारचा नवीन नियम आधी वाचा

Last Updated:

1 सप्टेंबरपासून ही सुधारित हॉलमार्किंग प्रणाली देशभर सुरू झाली असून, ग्राहकांना दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी डिजिटल ओळख प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू भारतीय संस्कृतीत नेहमीच महत्त्वाचे मानले गेले आहेत. लग्नसमारंभ असो वा धार्मिक विधी, सोनं आणि चांदीच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, अनेकदा या वस्तूंची शुद्धता तपासणे कठीण जाते आणि ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तसे पाहाता आता लोकांना खरं-खोटं सोनं आता ओळखता येतं, पण खोटं चांदी ओळखणं अनेकांना समजत नाही. शिवाय चांदीमध्ये आरामात भेसळ होते, त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून सरकारनं चांदीच्या दागिन्यांसाठी स्वैच्छिक हॉलमार्किंगची नवी प्रणाली लागू केली आहे.
1 सप्टेंबरपासून ही सुधारित हॉलमार्किंग प्रणाली देशभर सुरू झाली असून, ग्राहकांना दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी डिजिटल ओळख प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने यासाठी IS 2112:2025 हा नवीन मानक जारी केला आहे, जो आधीच्या IS 2112:2014 मानकाला बदलून लागू होईल.
या सुधारित नियमांतर्गत चांदीच्या दागिन्यांसाठी HUID-आधारित हॉलमार्किंग लागू करण्यात आली आहे. यामुळे दागिन्यांची शुद्धता, प्रकार, हॉलमार्किंग तारीख, तपासणी केंद्राची माहिती आणि ज्वेलरची नोंदणी संख्या ग्राहक BIS Care मोबाइल अ‍ॅपद्वारे सहज तपासू शकतील.
advertisement
नव्या मानकांत सात शुद्धता श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. 800, 835, 925, 958, 970, 990 आणि 999. यात 958 आणि 999 हे दोन नवीन ग्रेड जोडले गेले आहेत. हॉलमार्कमध्ये आता तीन घटक असतील. 'SILVER' शब्दासह BIS चिन्ह, शुद्धता ग्रेड आणि HUID कोड.
सध्या देशभरातील 87 जिल्ह्यांमध्ये सुमारे 230 तपासणी आणि मार्किंग केंद्रांना BIS मान्यता दिली आहे. वित्त वर्ष 2024-25 मध्ये 32 लाखांहून अधिक चांदीच्या दागिन्यांची हॉलमार्किंग करण्यात आली.
advertisement
पूर्वीच्या IS 2112:2014 मानकांत सहा शुद्धता ग्रेड होते. 800, 835, 900, 925, 970 आणि 990 आणि चार घटकांचा हॉलमार्क वापरला जात होता (BIS चिन्ह, शुद्धता ग्रेड, तपासणी केंद्र ओळख आणि ज्वेलर ओळख चिन्ह).
उद्दिष्ट काय?
या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्राहकांचे हक्क मजबूत करणे आणि चांदीच्या बाजारातील फसवणूक रोखणे हा आहे. BIS विविध शाखा कार्यालये आणि सोशल मीडियाच्या जनजागृती मोहिमा राबवत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Real or Fake Silver : तुम्ही खरेदी केलेली चांदी खरी आहे की खोटी? सरकारचा नवीन नियम आधी वाचा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement