'मी 13 वर्ष त्यांच्यासोबत...', महेश मांजरेकरांबद्दल बोलताना मानसकन्या भावुक, काय आहे दोघांमधलं खरं नातं?
- Published by:Pratiksha Pednekar
 
Last Updated:
Mahesh Manjrekr-Gauri Ingawale : नुकतंच गौरी इंगवलेने एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती मांजरेकर कुटुंबाबद्दल भरभरून बोलली.
मुंबई : 'दशावतार' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक वादळ आणलं. सर्वच स्तरातून या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढली की आता हा सिनेमा मल्याळम भाषेत पुन्हा रिलीज होणार आहे. अशातच सध्या चर्चा आहे ती महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या चित्रपटाची. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड घातल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे महेश मांजरेकरांची निर्मिती असलेलं 'कुणीतरी आहे तिथं' हे नवं नाटक रंगभूमीवर आलंय. नुकतंच या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. विशेष म्हणजे मांजरेकरांची लेक गौरी इंगवले या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.
महेश मांजरेकरांच्या नव्या नाटकात गौरी मुख्य भूमिकेत
'कुणीतरी आहे तिथं' या सस्पेन्स-थ्रिलर नाटकात मराठी कलाविश्वातील अनुभवी कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. अशातच या नाटकाच्या निमित्ताने गौरी इंगळेही बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परतली आहे. नुकतंच गौरीने एका मुलाखतीत नाटकात काम करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल, तसेच तिने महेश मांजरेकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. गौरी म्हणाली, "खूप वर्षांनी मी नाटक करत आहे, त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. कुमार सोहोनी सर या नाटकाचं दिग्दर्शन करत असून संपूर्ण टीम नवी आहे. मला खूप छान वाटतंय."
advertisement
नाटकातील भूमिकेबाबत बोलताना ती म्हणाली, "या भूमिकेत बरीच आव्हानं आहेत, पण मला आताच काही सांगायचं नाही. कारण ते प्रेक्षकांसाठी सरप्राइज आहे. हे एक रहस्यमय-थ्रिलर जॉनर असलेलं नाटक आहे. हे नाटक खूप वर्षांपूर्वी आधी झालेलं आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करतेय."
advertisement
महेश मांजरेकरांबद्दल बोलताना गौरी इंगवले भावूक
महेश मांजरेकर यांच्याबद्दल गौरी म्हणाली, "मला काय करायचं आहे, याबाबत आमच्यात बऱ्याच वेळा बोलणं होतं. पप्पांनी मला विचारलं, 'तुला हे नाटक करायला आवडेल का?' तेव्हा मी म्हटलं, 'हो मला मजा येईल करायला.' त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे, त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. त्यांनी माझ्या करिअरसाठी मला साताऱ्याहून इथे आणलं, मला मुलगी मानलं. मी गेली १३ वर्षे त्यांच्यासोबत आहे, पण मी त्यांच्यासाठी, कुटुंबीयांसाठी आयुष्यभर ऋणी आहे."
advertisement
काय आहे गौरी आणि महेश मांजरेकर यांच्यातील नातं?
दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गौरी इंगवले हिला मानसकन्या मानतात. महेश मांजरेकर यांना सई, सत्या आणि अश्वमी अशी तीन मुलंच आहे. पण गौरी त्यांची मानसकन्या आहे. गौरीला महेश आणि एका डान्सिंग शोमध्ये पाहिलं आणि तिला आपल्या कुटुंबात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. गौरीला महेश आणि मेधा मांजरेकर आपल्या सक्ख्या लेकीप्रमाणेच वागवतात, तर सई मांजरेकर देखील तिला बहीणच मानते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी 13 वर्ष त्यांच्यासोबत...', महेश मांजरेकरांबद्दल बोलताना मानसकन्या भावुक, काय आहे दोघांमधलं खरं नातं?


