Flight Cancellation News: फ्लाईट रद्द झाल्यास किती दिवसात मिळणार रिफंड, पैसे किती कापले जाणार माहितीये का? जाणून घ्या DCGA चे नवीन नियम

Last Updated:

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रवाशांना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. प्रवाशांना तिकिटाचे पैसे काही दिवसांत रिफंड मिळणार आहेत. सरकारने यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली आहे. नवीन नियम काय आहे? जाणून घेऊया...

'Aeroplane' हा शब्द ब्रिटिश इंग्रजीमध्ये वापरला जातो. म्हणजेच इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इतर कॉमनवेल्थ देशांमध्ये हा शब्द सामान्य आहे.
'Aeroplane' हा शब्द ब्रिटिश इंग्रजीमध्ये वापरला जातो. म्हणजेच इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इतर कॉमनवेल्थ देशांमध्ये हा शब्द सामान्य आहे.
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी प्रवाशांच्या तिकिटांबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार जर एखाद्या एअरलाइन्स सेवा कंपनीला काही आपत्तीजनक परिस्थितीमुळे विमान रद्द करावे लागते. विमान रद्द झाल्यानंतर तिकिटाचे पैसे वेळेवर रिफंड केले जात नाहीत. पूर्वी, विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पैसे रिफंड मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागायची. तथापि, आता भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्रवाशांना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. प्रवाशांना तिकिटाचे पैसे काही दिवसात रिफंड मिळणार आहेत. सरकारने यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली आहे. नवीन नियम काय आहे? जाणून घेऊया...
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) त्यांच्या नवीन नागरी विमान वाहतूक आवश्यक नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. हे बदल केवळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठीच नाहीत तर त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी देखील आहेत. ज्या प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केले किंवा जर विमान सुटलं तर आता प्रवाशांना पुढच्या काही दिवसांत आणि पूर्ण पेमेंट त्यांना मिळणार आहे. जर तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे बुक केले असेल, तर एअरलाइन्स सेवा कंपनी तुम्हाला 21 दिवसांत दिवसांत पैसे परत करेल. हे 21 दिवस कामकाजाचे दिवस (Working Days) असतील. याशिवाय, तुम्ही नॉन रिफंडेबल भाडे भरले असले तरीही, तुम्हाला विमानतळ कर, इंधन शुल्क आणि इतर शुल्क वेळेवर दिले जातील.
advertisement
जर तुम्ही तिकीट बुक केले आणि त्याच्या ४८ तासांच्या आत ते रद्द केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कृपया लक्षात ठेवा की, कॅन्सलेशन चार्ज आणि रिफंड प्रोसेसची संपूर्ण माहिती बुकिंग दरम्यान प्रदर्शित केली जाईल. भारतात असलेल्या परदेशी विमान कंपन्यांनाही भारताच्या परतफेडीच्या वेळापत्रकाचे आणि प्रक्रिया प्रणालीचे पालन करावे लागेल आणि हे नियम त्यांच्यासाठीही समान राहतील. भारतीय जितक्या प्रमाणात देशांतर्गत प्रवास करतात, तेवढ्याच प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रवासी प्रवास करतात. एअरलाइन प्रवाशांच्या तक्रारींकडे फारसे लक्ष देत नसल्याची माहिती वारंवार समोर येत आहे. ज्यामुळे प्रवाशांचे तिकिटाचे पैसे रिफंड होण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती. अशा परिस्थितीत, सतत वाढत्या तक्रारी लक्षात घेता, डीजीसीएने प्रवाशांना वेळेवर परतावा मिळावा यासाठी एक नवीन नियम आता सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Flight Cancellation News: फ्लाईट रद्द झाल्यास किती दिवसात मिळणार रिफंड, पैसे किती कापले जाणार माहितीये का? जाणून घ्या DCGA चे नवीन नियम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement