advertisement

'प्राजक्ताला प्रपोज केलंय, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, 'तिच्याकडूनही वर्कआऊट झालं'

Last Updated:

Prajakta Mali : मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ता माळीची तुफान क्रेझ आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील एका अभिनेत्याने प्राजक्ताला प्रपोज केल्याच्या चर्चा पसरल्या होत्या.

News18
News18
मुंबई: सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे. या शोमधील विनोदवीर ओंकार राऊत हा त्याच्या अफलातून विनोदी अभिनयामुळे सतत चर्चेत असतो.
काही काळापूर्वी ओंकार राऊतबद्दलचा एक किस्सा खूपच व्हायरल झाला होता. ओंकारने शोची सूत्रसंचालक प्राजक्ता माळीला प्रपोज केल्याच्या चर्चा होत्या. अखेर, ओंकारने एका मुलाखतीत या चर्चांवरचे मौन सोडले आहे.

प्राजक्ता माळीला प्रपोज करण्यावर ओंकार राऊतचं उत्तर

ओंकार राऊतने नुकतीच 'कविरत स्टुडिओ'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला 'लग्न कधी करणार आहेस?' असा प्रश्न विचारला गेला. यावर ओंकारने आपल्या खास अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, "माहित नाही... कोणाकडे मुलगी असेल तर सांगा. मी तर 'अनुपम'वर पण रजिस्टर करणार आहे. माझे बाबा मला म्हणाले, सगळ्या ठिकाणी आहेस, तर मग अनुपमवर पण ये ना... माहित नाही मला, पण होईल लवकरच."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)



advertisement
यावेळी त्याने प्राजक्ता माळीला प्रपोज करण्याच्या चर्चेवरही खुलासा केला. तो म्हणाला, "नाही, प्रपोज केलंय मी... पण ते खूप नॅचरल होतं, आणि तिच्याकडूनही ते जास्त चांगलं वर्क आऊट झालं."

प्राजक्ताकडून येणारी रिॲक्शन जास्त महत्त्वाची

ओंकारने सांगितलं की, 'हास्यजत्रा'मध्ये त्याचे आणि प्राजक्ताचे नोकझोक असलेले एक स्कीट होते. या स्कीटमध्ये ओंकार प्राजक्ताला टोकत असतो. ओंकार म्हणाला की, त्याचे डायलॉग स्क्रिप्टेड असले तरी, प्राजक्ताकडून येणारे रिॲक्शन अधिक चांगले वर्क आऊट होतात. "मी नुसता बोलतोय आणि ती शांत बसलीये, असं झालं असतं, तर ते एवढं वर्क नसतं झालं. ती पण चांगलं रिॲक्ट करते, त्यामुळे मजा येते नोकझोक करायला."
advertisement
प्राजक्तासोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना ओंकारने तिचे मन भरून कौतुक केले. तो म्हणाला, "ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. प्राजक्ता माळी खूप काळजी घेणारी मुलगी आहे. तिला तिच्या आजूबाजूच्या लोकांची, तिच्या मित्रांची खूप काळजी असते. जर तिला कुठून लांबून समजलं की ह्याचं काही बिनसलंय, तर ती स्वतःहून येते चौकशी करायला. ती मनाने खूप चांगली मुलगी आहे!"
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'प्राजक्ताला प्रपोज केलंय, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, 'तिच्याकडूनही वर्कआऊट झालं'
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement