राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, या तारखेला मतदान

Last Updated:

Election Commission Press Conference : राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा
निवडणुकांच्या तारखांची घोषणा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. मात्र विरोधकांच्या आपेक्षानंतरही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement

निवडणूक कार्यक्रम कसा असणार?

-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
advertisement
-मतमोजणीचा दिवस-३ डिसेंबर २०२५

निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, या तारखेला मतदान
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement