Welcome Home, 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीच्या घरी आला न्यू मेंबर, कोण आहे? पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rupali Bhosle : दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांनी नव्या गोष्टींची खरेदी केली. अशातच आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनेही नवी खरेदी केली असून तिच्या घरी नव्या मेंबरची एन्ट्री झाली आहे.
मुंबई : दिवाळीचा सण असून सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सण म्हटलं की लोक अनेक गोष्टींची नवी खरेदी करतात. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांनी नव्या गोष्टींची खरेदी केली. अशातच आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनेही नवी खरेदी केली असून तिच्या घरी नव्या मेंबरची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली.
'आई कुठे काय करते' फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेनेही दिवाळीच्या मुहूर्तावर नवी खरेदी केली आहे. तिने आलिशान कार घेतली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रुपाली भोसलेने घेतली नवी कार
रुपाली भोसलेने नवी कार खरेदी केल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवरून दिली. तिने व्हिडिओ शेअर करत तिच्या नव्या कारची झलक शेअर केली. कुटुंबासोबत जाऊन अभिनेत्रीने कार घेतली. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने म्हटलं 'वेलकम होम'. चाहते रुपालीला कार घेतल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या.
advertisement
advertisement
दरम्यान, रुपाली भोसले वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकली आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाच्या भूमिकेनं तिला खूप प्रसिद्धी दिली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांशी कनेक्ट असते. तिच्याविषयीच्या नवनवीन अपडेट्स ती शेअर करत असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 2:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Welcome Home, 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीच्या घरी आला न्यू मेंबर, कोण आहे? पाहा VIDEO